Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » नेपाळचा भूकंप २० अणुबॉम्बइतका शक्तिशाली

नेपाळचा भूकंप २० अणुबॉम्बइतका शक्तिशाली

nepal bhukamp1bकाठमांडू, [२७ एप्रिल] – २० अणुबॉम्ब टाकल्याने जितका आघात होऊ शकतो, तितकाच शक्तिशाली हादरा नेपाळला गेल्या शनिवारी बसलेल्या भूकंपामुळे बसला, अशी माहिती समोर आली आहे.
नेपाळकरिता भूकंप ही नवीन बाब नाही. या देशाने आजवर अनेक भूकंपांचा अनुभव घेतला आहे. जगातील सर्वात मोठ्या पर्वतरांगा असलेल्या या भागात दोन महाकाय टेक्टॉनिक प्लेटस् एकमेकांवर आदळल्याने हा भूकंप झाला होता. शनिवारच्या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल इतकी होती. गेल्या ८० वर्षांच्या काळात इतक्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप या देशात प्रथमच झाला आहे. २० अणुबॉम्बमध्ये विध्वंस करण्याची जी क्षमता आहे, तितकीच मोठी या भूकंपाची क्षमता होती, असे तज्ज्ञांचे मत आहे. कदाचित हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षाही कितीतरी शक्तिशाली अणुबॉम्बचा येथे विचार करण्यात येत आहे. यावरून नेपाळ भूकंपाची तीव्रता लक्षात येते, असे तज्ज्ञांना वाटते. दुसरे म्हणजे, या भूकंपाचा केंद्रबिंदू जिथे होता, तो नेपाळचा सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या काठमांडूपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे.
आणखी एक गोष्ट अशी की, जमिनीच्या अवघ्या १० ते १५ किलोमीटर खाली या सर्व हालचाली सुरू होत्या. यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात खचली आणि त्याचा प्रभाव जास्त राहिला. जमिनीच्या फार जास्त खोल जर भूकंपाचे धक्के बसले, तर जमिनीवर त्याचे परिणाम इतके भीषण होत नसतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22353

Posted by on Apr 28 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1750 of 2483 articles)


मुंबई, [२७ एप्रिल] - इस्रायलच्या सहकार्याने राज्यातील नागपूर, मुंबई, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा प्रयत्न करण्यात ...

×