Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » नेपाळमधील बळीसंख्या चार हजारांवर

नेपाळमधील बळीसंख्या चार हजारांवर

  • ६६ लाख लोक प्रभावित
  • सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही मदतीची प्रतीक्षा
  • बिहार, पश्‍चिम बंगालला पुन्हा धक्के =

Sewa International appeals to the benevolent to be generous to provide succor to the Nepal Earthquake affected.काठमांडू, [२७ एप्रिल] – नेपाळमध्ये गेल्या शनिवारी आलेल्या महाविनाशी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या आता चार हजारांवर गेली असून, असंख्य घरांची पडझड झाल्याने सुमारे ६६ लाख लोक प्रभावित झाले आहेत. रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही मदत व बचाव पथकांना पोहोचता आले नसल्याने तेथील स्थिती आता विदारक होत चालली आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळने आपले एक लाख सैनिक मदत कार्यात उतरविले आहेत. दरम्यान,
भारतात बिहार आणि पश्‍चिम बंगालला आज सोमवारी सायंकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. तथापि, त्यांची तीव्रता फारच कमी होती.
रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आज सोमवारी मात्र हवामान स्वच्छ झाले. काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मदत व बचाव कार्याला आणखी गती देण्यात आली आहे. ढिगार्‍यांखाली अजूनही हजारो लोक दबले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारतासह अनेक देशांमधील पथके नेपाळच्या विविध भागांमध्ये युद्धपातळीवर मदत व बचाव कार्यात गुंतली आहेत. भारत सरकारने राष्ट्रीय आपत्ती मदत दलाचे ७०० तज्ज्ञ मदतीसाठी तैनात केले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाने मृतांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आणि जखमींचा आकडा सात हजारांच्या घरात असल्याचे म्हटले आहे. केवळ काठमांडू खोर्‍यात एक हजारावर लोकांचा बळी गेला आहे. काही दुर्गम भागातही मदत व बचाव कार्य सुरू झाले असून, ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
पुन्हा भूकंपाचे धक्के
शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस नेपाळ व भारताला भूकंपाचे शक्तिशाली धक्के बसल्यानंतर आज सोमवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास नेपाळच्या काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. तथापि, या नव्या धक्क्यांमुळे मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. नागरिक मात्र घाबरून घराबाहेर आले आणि सुरक्षित ठिकाण गाठले.
३०० ऑस्ट्रेलियन बेपत्ता
कॅनबरा : नेपाळमधील भूकंपात ऑस्ट्रेलियाचे ३०० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता झाले आहेत. नेपाळमध्ये वास्तव्यास असलेल्या एकूण ५४९ नागरिकांपैकी केवळ २०० जणांशीच ऑस्ट्रेलियन सरकारचा संपर्क होऊ शकला आहे. उर्वरित नागरिकांविषयी कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही, असे कॅनबरा टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विदेश मंत्री ज्युली बिशप यांनी नेपाळला भूकंपातून सावरण्यासाठी ३० लाख डॉलर्सची मदत जाहीर केली असून, आपल्या देशातील बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22356

Posted by on Apr 28 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1749 of 2483 articles)


काठमांडू, [२७ एप्रिल] - २० अणुबॉम्ब टाकल्याने जितका आघात होऊ शकतो, तितकाच शक्तिशाली हादरा नेपाळला गेल्या शनिवारी बसलेल्या भूकंपामुळे बसला, ...

×