Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » पंतप्रधानांची जगन्नाथपुरी मंदिराला भेट

पंतप्रधानांची जगन्नाथपुरी मंदिराला भेट

modi visits jaganath-templeपुरी, [७ फेब्रुवारी] – १२ व्या शतकातील भगवान जगन्नाथपुरी मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भेट दिली आणि पूजाअर्चना केली. पुरीतील लोकांच्या प्रेमळ वागणुकीने आणि आदरातिथ्याने आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास अर्धा तास ते मंदिरात होते.
मंदिराचे पुजारी आणि भाजपाचे स्थानिक नेते यावेळी त्यांच्यासमवेत होते. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच या मंदिराला भेट दिली. याआधी २०१४ मध्ये त्यांनी मंदिराला भेट दिली होती. मंदिराचे मुख्य प्रशासक एस. सी. महापात्रा, पुजारी आणि इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर हात उंचावून लोकांच्या अभिवादनाचा मोदी यांनी स्वीकार केला. भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनाने आणि लोकांच्या भावपूर्ण स्वागतामुळे आपल्याला आनंद झाल्याचे नरेंद्र मोदी यांनी ट्टिटरवर म्हटले आहे. ओडिशा पोलिसांनी यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26778

Posted by on Feb 8 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (847 of 2477 articles)


कोझीकोड, [७ फेब्रुवारी] - भारतात कुठेही मला असहिष्णुता दिसलेली नाही आणि अनुभवलेली नाही, असे स्पष्ट करताना, या देशातील काही धर्मनिरपेक्षवादी ...

×