Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण » पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

PM Narendra Modi lays foundation stone for Fourth Container Terminal of JNPT Mumbaiमुंबई, [११ ऑक्टोबर] – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या भारत मुंबई कंटेनर या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जहाज बांधणी व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
थेट विदेशी गुंतवणुकीतून साकारला जाणारा हा नजीकच्या काळातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत ७९१५ कोटी असून दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.
जागतिक मानकांचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे टर्मिनल्स उभारण्यात येत आहे. रेल्वे आणि रस्तेमार्गाने विशाल कंटेनरची वाहतूक सुलभ आणि सहज व्हावी, यासाठी ४५ किलोमीटरचा मोठा रस्ताही तयार करण्यात येणार आहे.
भविष्यातही कंटेनर आयात-निर्यात व्यापार वृद्धीसाठी जेएनपीटीकडून प्रयास केले जात आहे. यासाठी विविध योजनाही तयार केल्या जात आहेत. जेएनपीटी बंदराने आपल्या स्वत:च्या मालकीची दोन बंदरे या आधीच बहुराष्ट्रीय कंपन्यांना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर दिली आहेत. याला जोडूनच आता ५० लाख कंटेनर हाताळणीच्या क्षमतेचे चौथे बंदर उभारणीला जेएनपीटी बंदराने सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात जेएनपीटी बंदरातून दरवर्षी एक कोटी कंटेनर मालाची आयात-निर्यात होणार आहे.
बंदरात मोठमोठी मालवाहू जहाजे लागण्यासाठी समुद्र चॅनेलची खोली १४ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे १० हजार कंटेनर क्षमतेची मालवाहू जहाजे सहजगत्या बंदरात स्थिरावू लागली आहेत.
पंतप्रधान तसेच त्यांच्यासमवेत आलेल्या प्रमुख अतिथीचे जेएनपीटी हेलिपॅडवर जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, नौकानयन सचिव राजीव कुमार, विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त प्रभात रंजन, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी स्वागत केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25105

Posted by on Oct 11 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1346 of 2476 articles)


=सुशील कोईराला यांचा पराभव= काठमांडू, [११ ऑक्टोबर] - के. पी. शर्मा ओली यांची आज रविवारी नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड ...

×