Home » कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्राची मंजुरी

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्राची मंजुरी

=आता शेतकरी करू शकणार मालाची ऑनलाईन विक्री=
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojanaनवी दिल्ली, [१ जुलै] – कृषी क्षेत्राचे मान्सूनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी देशातील प्रत्येक गावाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला आज बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सोबतच, ऑनलाईन राष्ट्रीय कृषी विपणन स्थापन करण्यालाही केंद्राने मंजुरी दिली असून, यामुळे शेतकरी आपला माल आता थेट ऑनलाईन विकू शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत कृषी मंत्रालयाने सादर केलेले हे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. देशातील एकूण १४२ दशलक्ष हेक्टर सुपीक जमिनीपैकी ६५ टक्के जमीन अजूनही सिंचनाच्या सुविधेखाली आली नसल्यामुळे केंद्राचा हा निर्णय कृषी क्षेत्राला नवसंजीवणी देणाराच ठरणार आहे.
देशातील सर्व प्रकारच्या कृषी जमिनींना सिंचनाचे सुरक्षा कवच पुरविण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून पीक घेणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक गावातील शेतीला मुबलक पाणी मिळावे, यासाठी प्रकल्प तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याची तरतूदही या योजनेत आहे, अशी माहिती बैठकीशी संबंधित सूत्राने दिली.
ऑनलाईन कृषी विपणन
कॅबिनेटच्या बैठकीत ऑनलाईन राष्ट्रीय कृषी विपणन स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकर्‍यांना आपला उत्पादित माल थेट ऑनलाईन विकणे शक्य होणार आहे. सध्या शेतकर्‍यांना मंडी किंवा बाजार समित्यांकडेच आपला माल सादर करावा लागतो. यासाठी शेतकर्‍यांकडून उत्पादनांवर विविध प्रकारचे करही आकारले जातात. या त्रासातून शेतकर्‍यांची मुक्तता करण्यासाठीच सरकारने त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23228

Posted by on Jul 2 2015. Filed under कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1586 of 2477 articles)


मुंबई, [१ जुलै] - बदलत्या हवामानामुळे येणार्‍या काळात शेतीसमोर मोठी आव्हाने उभी राहणार आहेत. तेव्हा शेतकर्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा ...

×