Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जर्मनीत भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जर्मनीत भव्य स्वागत

=‘मेक इन इंडिया’च दौर्‍याचा केंद्रबिंदू=
Modi in Germany(C)हॅन्नोव्हर, [१२ एप्रिल] – तीन देशांच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला फ्रान्सचा यशस्वी दौरा आटोपून आज रविवारी जर्मनीत दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेला जर्मनीने पाठिंबा द्यावा आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, हाच पंतप्रधान मोदींच्या जर्मन भेटीचा मुख्य हेतू आहे.
जर्मनीतील आपल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात पंतप्रधान मोदी पंतप्रधान ऍन्जेला मर्केल आणि इतर व्यावसायिक नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. जर्मन कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा फायदा घेत भारतात गुंतवणूक करावी, अशा आशयाचे आमंत्रण पंतप्रधानांकडून दिले जाण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान मोदींचा मुक्काम असलेल्या हॉटेलबाहेर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि पंतप्रधानांचे आगमन होताच ‘मोदी…मोदी…’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. व्यवसाय आणि तंत्रज्ञान हे पंतप्रधानांच्या जर्मनी दौर्‍यातील मुख्य मुद्दे असतील.
यावर्षी भारत भागीदार असलेल्या हॅनोेव्हर व्यापार मेळ्याच्या उद्‌घाटनाने पंतप्रधान मोदी यांच्या जर्मनी दौर्‍याची सुरुवात होणार आहे. सुमारे ४०० भारतीय कंपन्या या मेळ्यात सहभागी होणार असून, १०० ते १२० भारतीय सीईओ व जर्मनीचे सुमारे तीन हजार नागरिक यावेळी हजेरी लावण्याची शक्यता आहे. यावेळी महात्मा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21985

Posted by on Apr 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1813 of 2483 articles)


=पुतण्या अभयसिंगचा दावा, फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी= चंदीगड, [१२ एप्रिल] - देशाच्या स्वातंत्र्यासाठी तरुण वयात हसत हसत फासावर चढणारे शहीद ...

×