|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.14° C

कमाल तापमान : 30.71° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 3.57 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.71° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.15°C - 31.32°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.76°C - 29.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.37°C - 30.01°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.04°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.7°C - 29.86°C

sky is clear
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासाठी प्रेरणास्रोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासाठी प्रेरणास्रोत

डेन्मार्कच्या पंतप्रधानांकडून कौतुक,
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, असे म्हणत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेड्रिक्सन यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. सोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींना डेन्मार्कला येण्याचे आमंत्रणही दिले. फ्रेड्रिक्सन तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर असून, त्यांचे शनिवारी नवी दिल्लीत आगमन झाले.
उल्लेखनीय म्हणजे, डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांनी मेट यांचे स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत सोहळा झाला. पंतप्रधान मोदी आणि फ्रेड्रिक्सन यांच्या द्विपक्षीय चर्चेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकरदेखील सहभागी झाले होते.
भारत आणि डेन्मार्कने जल आणि पर्यावरणशील इंधनावर काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. आम्ही आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांतही सोबत काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा हरित सहयोग महत्त्वाकांक्षी आहे, असे मेट फ्रेड्रिक्सन यांनी म्हटले आहे. आम्ही भारताकडे एक जवळचा सहकारी देश म्हणून पाहतो, असेही मेट यांनी सांगितले.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेड्रिक्सन आणि माझी ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असली तरी कोरोना काळात भारत आणि डेन्मार्कदरम्यान संपर्क आणि सहकार्याची गती कायम होती, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. जवळपास वर्षभरापूर्वी आम्ही आभासी समिटमध्ये भारत आणि डेन्मार्क दरम्यान ग्रीन धोरणात्मक भागीदारी स्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय उभायदेशांच्या दीर्घकालीन विचार आणि पर्यावरणाप्रती सन्मानाचे प्रतिक आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
फे्रड्रिक्सन यांची ताजमहालला भेट
फ्रेड्रिक्सन आणि त्यांचे पती बो टेंगबर्ग यांनी आज रविवारी सकाळी आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालला भेट दिली. ताजमहाल हे जगातील अतिशय सुंदर ठिकाण आहे, असे वर्णन त्यांनी केले. फ्रेड्रिक्सन शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास आग्रा येथील हवाई दलाच्या तळावर दाखल झाल्या होत्या. तिथे उत्तरप्रदेशचे ऊर्जा मंत्री कांत शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. ताजमहालच्या भेटीनंतर त्यांनी आग्रा किल्ल्याला भेट दिली.

Posted by : | on : 10 Oct 2021
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g