Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » पहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार

पहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार

=भारत इतिहास रचणार=
first indian space shuttleचेन्नई/नवी दिल्ली, [२२ मे] – हवामान पोषक राहिले आणि वार्‍याची गती नियंत्रणात राहिली, तर भारत उद्या सोमवारी इतिहास रचणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले पहिल्या ‘स्पेस शटल’ची प्रतिकृती (प्रोटोटाईप) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात झेपावणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुन्हा पुन्हा वापरात येणारे परिपूर्ण ‘स्पेस शटल’ विकसित करण्याचा भारताचा मार्गही मोकळा होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने या ‘स्पेस शटल’ची प्रतिकृती तयार केली असून, तिचे वजन ११ टन इतके आहे. श्रीहरीकोटा येथील रॉकेट पोर्ट येथे या ‘स्पेस शटल’च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचे यश आता केवळ निसर्गावर अवलंबून आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख किरण कुमार यांनी वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत दिली.
‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ असे या ‘स्पेस शटल’चे नाव असून, अंतराळात आपल्या पायाभूत सुविधा कमी खर्चात प्रस्थापित करण्याचा भारताचा हा मोठा धाडसी प्रयत्न राहणार आहे. अशा प्रकारचे ‘स्पेस शटल’ प्रत्यक्षात खरे ठरले, तर अंतराळातील पायाभूत सुविधांवर होणारा खर्च किमान दहा टक्के कमी होणार आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतील काही निवडक भाग असा :-
प्रश्‍न : इंडियन स्पेस शटल किंवा ‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ म्हणजे नेमके काय?
उत्तर : अंतराळातील पायाभूत सुविधा आणि प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्यासाठी आमच्याकरिता ही एक यंत्रणाच आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या प्रयोगाची आम्ही मालिका हाती घेतली आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास आमच्यासाठी हा हायपरसॉनिक प्रयोगच आहे. आमचे स्पेस शटल वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून आहे. अंतराळातून हे शटल पुन्हा पृथ्वीवर परत बोलावले जाऊ शकते. स्पेस शटलची ही एक प्रतिकृती आहे. आणखी बरेच काही करायचे आहे. वास्तविक ‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ तयार करण्यासाठी आणखी बरेच टप्पे पार करायचे आहेत. त्यासाठी आम्हाला किमान एक दशकाचा अवधी हवा आहे. त्यानंतर आम्हाला अतिशय कमी खर्चात प्रक्षेपणाची क्षमता प्राप्त होणार आहे.
प्रश्‍न : श्रीहरीकोटा येथील केंद्रातूनच ते प्रक्षेपित करणे आवश्यक आहे काय आणि प्रक्षेपणानंतर ते बंगालच्या उपसागरात कुठेतरी पडणार आहे काय?
उत्तर : होय, पहिला प्रयोग असाच असतो. आम्ही हे स्पेस शटल श्रीहरीकोटा येथून सोडणार आहोत. ते समुद्रात पाडण्याची आमची योजना आहे. हा पहिला प्रयोग आहे. पण, त्यानंतर श्रीहरीकोटाच्या बेटावरच स्पेस शटल परत बोलावण्याचे तंत्रज्ञान आम्ही विकसित करणार आहोत.
प्रश्‍न : अमेरिकेने त्यांच्या स्पेस शटलकरिता ज्या प्रकारे रन-वे तयार केला, तसाच रन-वे तुम्ही देखील तयार करणार आहात काय? भविष्यात आम्ही देखील आपले स्पेस शटल रन-वेवर उतरताना पाहू शकणार आहोत काय?
उत्तर : अर्थातच, आम्ही जेव्हा या तंत्रज्ञानाच्या अंतिम टप्प्यात येऊ, तेव्हा तुम्ही देखील या इतिहासाचे साक्षीदार राहणार आहात. श्रीहरीकोटाच्या रन-वेवरच ते उतरेल, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत.
प्रश्‍न : बहुतांश देश वातावरणावर आधारित शटल विकसित करण्यात अनुत्सूक असताना, तुम्ही हा मार्ग का निवडला?
उत्तर : कमी खर्चात अंतराळात पोहोचण्याचा, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपल्यापुढे सध्या अतिशय चांगल्या संधी आहेत, असा मला विश्‍वास आहे.
प्रश्‍न : तुम्ही या स्पेस शटलच्या प्रक्षेपणाबाबत उत्साहित आहात काय?
उत्तर : अर्थातच, आम्ही सारेच अतिशय उत्साहित आहोत. आता आम्हाला केवळ उद्याची प्रतीक्षा आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28433

Posted by on May 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (289 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२२ मे] - नुकत्याच जाहीर झालेल्या काही शालेय परीक्षांच्या निकालांमध्ये यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

×