Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पुनश्‍च हल्ल्यासाठीही सरकारशी सहमत

पुनश्‍च हल्ल्यासाठीही सरकारशी सहमत

all-party-meeting-on-surgical-strikeनवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारतीय लष्कराने गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या धडक कारवाईचे आज येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत स्वागत करण्यात आले. या कठीण प्रसंगी आम्ही केंद्र सरकार तसेच भारतीय लष्कराच्या पाठिशी असल्याचा निर्वाळाही सर्वपक्षीय बैठकीने दिला.
गुलाम काश्मिरात घुसून लष्कराने केलेल्या धडक कारवाईची माहिती देण्यासाठी आज गृहमंत्रालयात या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि महासंचालक कारवाई लेफ्टनंट जनरल रणवीरसिंह यांनी या धडक लष्करी कारवाईबाबतची माहिती दिली. आवश्यकता पडली भारतीय लष्कर अशा प्रकारची कारवाई पुन्हा करेल, असे लेफ्टनंट जनरल रणवीरसिंह यांनी या बैठकीत स्पष्ट केले. लष्कराच्या या कारवाईचे सर्वपक्षीय नेत्यांनी या बैठकीत स्वागत केले आणि आम्ही सरकार तसेच लष्करासोबत असल्याचे सांगितले. दहशतवादाच्या विरोधात केंद्र सरकार तसेच लष्कराने केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, असे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. या मुद्यावर संपूर्ण देश एकजूट असल्याचे जदयुचे शरद यादव म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीतील कामकाजाची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नंतर पत्रकारांना दिली.
गुलाम काश्मिरातील या तळांवरून घुसखोरांनी भारतात घुसखोरी करत दहशतवादी कारवाया केल्या, भविष्यातही त्यांच्याकडून अशाच कारवायांची आशंका असल्यामुळे भारताला ही कारवाई करावी लागली, असे नायडू यांनी सांगितले. जम्मू काश्मीर तसेच देशाच्या अन्य भागात दहशतवादी कारवाया करण्याची पाकप्रशिक्षित अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती सरकार आणि लष्कराजवळ होती, त्यामुळे भारतीय लष्कराला ही कारवाई करावी लागली, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माकपचे सीताराम येचुरी, जदयुचे शरद यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, बसपाचे सतीश मिश्रा, राजदचे प्रेमचंद गुप्ता यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29325

Posted by on Sep 30 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (87 of 2477 articles)


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे लक्ष्य अर्थात टार्गेट असते त्यांच्यावरच थेट ...

×