Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, १५३ ठार

पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, १५३ ठार

paris terror attack 2015पॅरीस, [१४ नोव्हेंबर] – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काल शुक्रवारी रात्री एकाच वेळी जवळपास सात ते आठ ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यात १५३ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. पॅरिसमधील स्टेडियम, हॉटेल, कॉन्सर्ट हॉल अशा सात ठिकाणी हे हल्ले काल रात्री १० च्या सुमारास झाले. या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत आणीबाणी लागू केली आहे. हा हल्ला करणार्‍या पाच संदिग्ध दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याची माहिती फ्रान्स पोलिस प्रमुखांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसमध्ये एकूण सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. पॅरिसमधील उपहारगृह, कन्सर्ट हॉल आणि स्टेडियमबाहेर हे हल्ले झाले आहेत. बाटाक्लॅन थिएटरमध्ये अमेरिकी वाद्यवृंद कार्यक्रम सादर करत असताना हा हल्ला झाला असून याठिकाणी सर्वात जास्त जिवीतहानी झाली आहे. दहशतवाद्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर काही वेळाने या दहशतवाद्यांनी स्वतःला स्फोटामध्ये उडवून घेतले. यात १०० नागरिक ठार झाले.
तर फ्रान्स – जर्मनीमध्ये फुटबॉल मॅच सुरू होती. या दरम्यान स्टेडियमजवळ दोन आत्मघाती हल्ले झाले. मुख्य म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा तेव्हा स्टेडियममध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद हे हजर होते. सुदैवाने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी स्टेडियमच्या मध्यभागी धाव घेतली. दुसरीकडे एका उपहारगृहात गोळीबार झाला. तर फ्रान्सच्या वर्दळीच्या भागांमध्येही गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी एकूण सात हल्ले झाले. यात १५३ नागरिक मृत्यूमुखी पडले असून अनेक जखमी आहेत. जखमींना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून या हल्ल्याचे जाहीर कौतुक केले आहे. फ्रान्सने सीरियामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पॅरीसमध्ये हल्ला केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. फेंच राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलॉंद यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. पॅरिसची मेट्रो, रेल्वे आणि विमान सेवा बंद करण्यात आली असून शहरातील शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच नागरिकांना घराच्या बाहेर निघण्यास बंदी घातली आहे. पॅरिसमध्ये पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून १५०० लष्करी जवानांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, फ्रान्समधले सगळे भारतीय सुरक्षित असल्याची माहिती भारतीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25428

Posted by on Nov 14 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1254 of 2483 articles)


आंदोलन राजकीय नाही, हे सिद्ध करा मनोहर पर्रीकर यांची कणखर भूमिका अरक्कोनम्, [१३ नोव्हेंबर] - माजी सैनिकांनी मेडल्स परत ...

×