Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पॅरीसवर हल्ल्याचे संकट कायम

पॅरीसवर हल्ल्याचे संकट कायम

=शस्त्र, स्फोटकांसह महिला दहशतवादी फरार=
paris attackपॅरीस, [१० जानेवारी] – येथील प्रख्यात व्यंग्यचित्र साप्ताहिक चार्ली एब्दोवर हल्ला करून १० जणांना ठार मारणार्‍या आणि त्यानंतरही सतत तीन दिवस हैदोस घालून आणखी चौघांना गोळ्या घालणार्‍या दोन्ही दहशतवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला असला, तरी त्यांच्यातीलच एक महिला अतिरेकी शस्त्र व स्फोटकांसह फरार झाली असल्याने या शहरावरील धोका अजूनही टळला नसल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली. तिचा शोध घेण्यासाठी शहराच्या सर्व मार्गांची नाकेबंदी करण्यात आली असून, व्यापक स्तरावर मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शुक्रवारी दोन अतिरेक्यांनी एका गोदामात आश्रय घेत, काही नागरिकांनाही ओलिस ठेवले होते. एका अतिरेक्याची पत्नीही तिथेच होती. पोलिसांनी रात्री दोन्ही अतिरेक्यांना ठार मारले होते. पण, ही महिला मात्र शस्त्र व स्फोटकांसह पळून जाण्यात यशस्वी ठरली. पोलिसांनी तिचे छायाचित्र प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित केले आहे. तिच्याकडे अत्याधुनिक रायफल आणि स्फोटके असल्याने ती शहरात आणखी रक्तपात घडवू शकते, अशी भीती सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
आयफेल टॉवर अंधारात
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी येथील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवरील रोषणाई शुक्रवारी रात्री बंद करण्यात आली होती. भारतात आग्रा येथे असलेल्या ताजमहालनंतर ‘प्रेमाचे प्रतिक’ अशी ओळख असलेले आयफेल टॉवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आयफेल टॉवरमध्ये अंधार करण्यात आला, तेव्हा हजारो नागरिक हातात मेणबत्त्या घेऊन उभे होते. त्यांनी मृतकांना दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19536

Posted by on Jan 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (2278 of 2483 articles)


=‘फर्लो’ला मुदतवाढ नाकारली= मुंबई, [१० जानेवारी] - डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संचित रजा अर्थातच ‘फर्लो’वर बाहेर आलेला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक ...

×