Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » प्रजासत्ताक दिनासाठी राजधानीत कडेकोट सुरक्षा

प्रजासत्ताक दिनासाठी राजधानीत कडेकोट सुरक्षा

=राजनाथसिंहांनी घेतला सुरक्षेचा आढावा=
security-men-to-guard-delhi-on-republic-dayनवी दिल्ली, [१८ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
गतवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते, त्यामुळे त्यावेळी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३० लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे ओलांद यांच्या भारतभेटीच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणाही भारतात दाखल झाल्या आहेत.
प्रजासत्ताक दिन संचलनासाठी तशीही दरवर्षीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहात असते. यावर्षी मात्र पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कोणतीही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे यावेळीही मागील वर्षीप्रमाणेच सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत देशांतर्गंत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि सर्व सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
दिल्ली पोलिसांसोबतच राजधानीत निमलष्करी दलाच्या १०० कंपन्या म्हणजे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये निमलष्करी दलाच्या ५० कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी निमलष्करी दलाच्या ९५ कंपन्या राजधानीत तैनात करण्यात आल्या होत्या. म्हणजे यावर्षी निमलष्करी दलाच्या जास्त कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मेट्रो स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेतही यावेळी वाढ करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकावर यावेळी द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दोनदा सुरक्षा चाचणीतून जावे लागणार आहे. रेल्वेस्थानक तसेच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, राजधानीतील हॉटेल्सची झडती घेतली जात आहे. संवेदनशील भागात विमानभेदी तोफा तैनात करण्यात आल्या असून, राजधानीतील काही भाग ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. विविध मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिन समारंभाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या पोलिस प्रमुखांचीही नुकतीच बैठक झाली. या बैठकीला उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तराखंडचे पोलिस प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26569

Posted by on Jan 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (895 of 2477 articles)


=मर्कट टोपी घालून आले होते बंदुकधारी= लुधियाना, [१८ जानेवारी] - राष्ट्रीय स्वयंसेयक संघाच्या येथील शाखा मैदानावर आज सोमवारी सकाळी साडेसहा ...

×