Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » फॉक्सकॉन गुंतवणार पाच अब्ज डॉलर्स

फॉक्सकॉन गुंतवणार पाच अब्ज डॉलर्स

=‘मेक इन इंडिया’ला महाराष्ट्रात गती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी=
Maharashtra CM Devendra Fadnavis and Foxconn chairman Terry Gou at the signing of an MoU, in Mumbaiमुंबई, [८ ऑगस्ट] – इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मितीच्या क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी एक असलेल्या फॉक्सकॉनने महाराष्ट्रात आगामी पाच वर्षांत तब्बल पाच अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तायवानस्थित या कंपनीला राज्यात आपला प्रकल्प उभारता यावा, यासाठी राज्य सरकार कंपनीला १५०० एकर जमीन उपलब्ध करून देणार आहे. यामुळे राज्यातील ५० हजार युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. फॉक्सकॉनसोबत आपल्या सरकारने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार ही कंपनी आगामी पाच वर्षांच्या काळात राज्यात पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गोऊ यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला महाराष्ट्रात गती मिळाली असल्याचे दाखवून देणारी ही घडामोड आहे.
फॉक्सकॉन सोबत सामंजस्य करार करण्यासाठी आयोजित समारंभात बोलताना टेरी गोऊ म्हणाले की, महाराष्ट्रातील आमच्या प्रस्तावित प्रकल्पात संशोधन आणि विकासासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनावरही भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात उत्तम दर्जाची बुद्धिमत्ता आहे. शिवाय, सॉफ्टवेअर व हार्डवेअर सुविधाही येथे मोठ्या प्रमाणात असल्यानेच आम्ही आपल्या प्रकल्पाकरिता या राज्याची निवड केली. ही कंपनी अनेक दिवसापासून महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक भागीदाराच्या शोधात होती. स्मार्टफोनच्या जागतिक बाजारपेठेत आपले अस्तित्व आणखी प्रभावी करण्यासाठी भारतातील विविध राज्यांत प्रकल्प सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, ही कंपनी आपला प्रकल्प पुण्याजवळील तळेगावात उभारणार आहे. या प्रकल्पामुळे ५० हजार युवकांना रोजगार तर मिळेलच, शिवाय महाराष्ट्रात आयफोनच्या किमतीतही प्रचंड घट होईल. याचा फायदाही राज्यातील नागरिकांनाच मिळणार आहे. ऍपलचा जो आयफोन जगात प्रसिद्ध आहे, त्या फोनची निर्मिती या करारामुळे आता महाराष्ट्रात होणार आहे. ब्लॅकबेरी, ऍपल, एक्सबॉक्स, किंडल यासारख्या आघाडीच्या कंपन्यांसाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती फॉक्सकॉनकडूनच केली जाते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23601

Posted by on Aug 9 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1530 of 2476 articles)


=टायगर मेमनची धमकी= मुंबई, [७ ऑगस्ट] - याकुब मेमनच्या फाशीची मोठी किंमत भारताला चुकवावी लागेल. आपल्या भावाचा बदला घेतल्याशिवाय मी ...

×