Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बंगळुरू सर्वांत स्वच्छ राजधानी

बंगळुरू सर्वांत स्वच्छ राजधानी

=म्हैसूर देशातील सर्वोत्कृष्ट शहर, ‘स्वच्छ भारत’अभियानातील पाहणीचा निष्कर्ष=
Tनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहराने बाजी मारली आहे. देशातील सर्वाधिक स्वच्छ राजधानी म्हणून या शहराची निवड करण्यात आली असून, कर्नाटकातीलच म्हैसूर हे सर्वोत्कृष्ट शहर ठरले आहे.
केंद्रीय नगर विकास मंत्राललयाने ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत सर्वाधिक स्वच्छ शहरांची श्रेणी निश्‍चित केली आहे. देशभरातील राज्यांमध्ये कर्नाटकाने या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या राज्यातील आणखी तीन शहरांची ‘टॉप टेन’मध्ये निवड करण्यात आली आहे. पश्‍चिम बंगालनेही स्वच्छतेची विशेष काळजी घेतली असल्याचे मंत्रालयाच्या पाहणीत दिसून आले. या राज्यातील २५ शहरे आणि इतर गावे ‘टॉप १००’ मध्ये आहेत.
उघड्यावर शौच करण्यापासून नागरिकांना परावृत्त करणे, तसेच टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणे हे निकष या शहरांची निवड करताना विचारात घेण्यात आले, अशी माहिती मंत्रालयाने आपल्या अहवालात दिली.
देशातील ४७६ शहरांमध्ये म्हैसूर शहरात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले असून, टाकाऊ वस्तू आणि कचराही या शहरात आता कुठेही दिसत नाही.
देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियान अधिकच गंभीरपणे घेतले आहे. दक्षिणेतील ३९ शहरांनी ‘टॉप १००’मध्ये धडक दिली आहे. त्याखालोखाल पूर्वेकडील २७, पश्‍चिमेकडील १५, उत्तरेकडील १२, तसेच ईशान्य भारतातील सात शहरांना यात स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे केवळ १५ राजधानीच्या शहरांनाच ‘टॉप १००’ मध्ये स्थान मिळाले असून, पाच राजधान्यांना ३०० मध्येही जागा मिळाली नाही. बिहारची राजधानी असलेले पाटणा शहर सर्वात मागे असून, या शहराला ४२९ वा क्रमांक मिळाला आहे.
‘टॉप टेन’ मध्ये ज्या शहरांना स्थान मिळाले आहे, त्यात म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी मुंबई, कोची, हासन, मंड्या, बंगळुरू, तिरुवनंतपुरम्, हालिशार आणि गंगटोकचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील दामोह हे शहर सर्वात शेवटी म्हणजे ४७६ व्या क्रमांकावर आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23586

Posted by on Aug 9 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1536 of 2477 articles)


=आचार्य देवव्रतांकडे हिमाचलची सूत्रे= नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारचे नवे राज्यपाल म्हणून केंद्र सरकारने आज ...

×