Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बंदुकीने समस्या सुटणार नाही

बंदुकीने समस्या सुटणार नाही

=तुमच्यातही मानवता आहे, नक्कीच बदलाल : दंतेवाडा जिल्ह्यात पंतप्रधानांचे प्रतिपादन=
PM at schoolदंतेवाडा, [९ मे] – खांद्यावर नांगर घेऊनच कोणत्याही समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो. बंदुकीने समस्या सुटणार नाही. आपल्या सभ्य समाजात हिंसाचाराला कुठेही जागा नाही. तुमच्यातही (नक्षलवादी) मानवता आहे आणि तुम्ही एक दिवस नक्कीच बदलाल, असा मला ठाम विश्‍वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे केले.
छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासोबतच २४ हजार कोटी रुपये किमतींच्या दोन भव्य प्रकल्पांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान येथे आले होते. मेगा स्टिल प्रकल्प आणि राऊघाट-जगदलपूर रेल्वे मार्गाकरिता छत्तीसगड सरकारसोबत दोन सामंजस्याचा करार यावेळी झाला. पहिल्या एक तासातच या प्रकल्पांकरिता २४ कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली, हे विशेष! आणखी एक वैशिष्ट म्हणजे, या नक्षलप्रभावित जिल्ह्याला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.
आपल्याला विकास आणि शांतता हवी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे जे मृत्यूचे तांडव सुरू आहे, त्याला विराम द्या आणि विकासाचा मार्ग मोकळा करा. खांद्यावर नांगर घेऊनच विकासाचा शुभारंभ केला जाऊ शकतो. हातात बंदूक घेऊन विकास होणार नाही. हिंसाचाराला आपल्या सभ्य समाजात कुठेही जागा नसल्याने बंदूक खाली ठेवा आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हा, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले.
ज्या नक्षलबाडीतून नक्षली हिंसाचाराला प्रारंभ झाला होता, त्या नक्षलबाडीत आता कोणीही हातात बंदूक घेत नाही. तुम्ही देखील स्वत:ला बदला, असे अमानवी होऊ नका. तुम्ही जे मृत्यूचे तांडव सुरू केले आहे, ते थांबवा. मला पूर्ण विश्‍वास आहे, एक दिवस तुम्ही नक्कीच बदलाल, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, तुमच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीने ज्यांचा जीव गेला, त्यांच्या मुलांना मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी आधीच पेन आणि संगणक दिले आहे. तुमच्या बंदुकांनी आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. त्यातील काहींच्या कुटुंबीयांची मी भेट घेतली आहे. आयुष्य जगताना त्यांना अतिशय भीषण समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे माझे तुम्हाला कळकळीचे आवाहन आहे की, बंदूक खाली ठेवा आणि राष्ट्रउभारणीत सहभागी व्हा.
फक्त पाच दिवस…
नक्षल्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी त्यांना केवळ पाच दिवस सामान्य व्यक्तीप्रमाणे जगण्याचा आगळा प्रयोग नक्षल्यांना करून पाहण्याचा सल्ला दिला. फक्त दोन-पाच दिवसांसाठी तुम्ही खांद्यावरची बंदूक खाली ठेवा. सामान्य आदिवासींसारखा पोशाख धारण करा आणि तुमच्यामुळे ज्यांनी कुटुंबीय सदस्य गमावले त्या घरात जाऊन राहा. तुम्ही कोण आहात ते सांगू नका. त्या परिवारातील मुलाशी बोला. त्याने जे काही भोगले, ते अनुभव ऐकून तुम्ही हादरून जाल. तुम्ही किती मोठे पाप करीत आहात, याची जाणीव होईल आणि आपोआपच तुमच्यात परिवर्तन घडेल, असा आगळावेगळा मार्ग मोदी यांनी नक्षल्यांना सुचवला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22470

Posted by on May 10 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1720 of 2477 articles)


=मनोहर पर्रिकर यांचा सणसणीत टोला= नवी दिल्ली, [९ मे] - राजकारणातून काही दिवसांची विश्रांती घेऊन परत आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल ...

×