Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » बदलत्या भारताचा फायदा घ्या!

बदलत्या भारताचा फायदा घ्या!

  • पंतप्रधानांचे उद्योगपतींना आवाहन
  • २६ व्यावसायिक करारांवर स्वाक्षरी
  • नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याचे फलित =

pm-modi-chinese-business-leadersशांघाय, [१६ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्‍याच्या तिसर्‍या आणि अखेरच्या दिवशी आज शनिवारी भारत आणि चीन यांच्यात २६ व्यवसायिक करार करण्यात आले. या करारांमुळे एकूण २२ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्‍याचे हे सर्वात मोठे फलित मानले जात आहे. भारतात आता आमूलाग्र बदल झाला आहे. अर्थव्यवस्था बळकट झालेली आहे. या स्थितीचा जागतिक गुंतवणूकदारांनी फायदा घ्यायलाच हवा, असे आवाहन मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी आज शनिवारी आपल्या चीन दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी चीनमधील २२ बड्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. २६ व्यवसायिक करारांवर स्वाक्षर्‍या झाल्यानंतर मोदी यांनी चिनी उद्योगपतींना ‘मेक इन इंडिया’अभियानात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. यावेळी मोदी यांनी ‘५-एफ’चा मंत्र दिला. फार्म (कृषी), फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन असे हे पाच एफ आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारतातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सरकार उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळेच उद्योगांच्या उभारणीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उद्योगांना सुलभता निर्माण करण्याच्या दिशेने सतत काम सुरू आहे. भारतात उद्योगांसाठी निर्णय घेतल्यास आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
चीन हा जगाचा कारखाना आहे, तर भारत जगाचे ‘बॅक ऑफिस’ आहे. यामुळे आपण एकत्र आल्यास विकास आणि समृद्धी आणू शकतो. तुम्ही भारतात या आणि झालेल्या बदलांचा स्वत: अनुभव घ्या. तुम्हाला खात्री पटेल आणि त्यातूनच भारत-चीन भागीदारी आणखी विकसित होईल, असे भारत-चीन व्यावसायिक फोरमला संबोधित करताना मोदी यांनी सांगितले. या बैठकीत ३९ भारतीय उद्योजक उपस्थित होते. भारत आणि चीन या प्राचीन संस्कृती आहेत. आताचा काळ हा आशियाचा आहे. आशियाई देशांना एकत्र आणण्याची शक्ती बौद्ध धर्मात आहे. भारत आणि चीनमध्ये अनेक प्रकारचे साम्य आहे. त्यामुळे एकत्र येऊन काम केल्यास आपण हवे ते साध्य करू शकतो, असेही मोदी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22577

Posted by on May 17 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1700 of 2483 articles)


=केजरीवाल-जंग यांच्यात संघर्षाचा भडका= नवी दिल्ली, [१६ मे] - दिल्ली सरकारचा विरोध झुगारून शकुंतला गॅमलीन यांनी आज शनिवारी हंगामी मुख्य ...

×