बलुचिस्तानमध्ये जाळला पाकचा झेंडा
Sunday, August 21st, 2016=भारताच्या समर्थनार्थ नारेही लागले=
इस्लामाबाद, [२० ऑगस्ट] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रांतात उत्साह निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी बलुचिस्तानच्या सीमेवर शेकडो नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करतानाच भारताच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
पाकच्या सैनिकांनी शुक्रवारी या सीमावर्ती भागातील अफगाण नागरिक आणि बलुविस्तानच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि अफगाणिस्तानला जोडणार्या सीमेवरील एक मार्ग बंद केला.
पाकमधील आघाडीच्या डॉन या दैनिकाच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानचा ९७ वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी शेकडो अफगाणी नागरिक बलुचिस्तानच्या चमन भागातील फ्रेण्डशिप गेटजवळ एकत्र आले होते. त्यांच्याकडे असलेल्या फलकांवर पाकविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या लोकांनी पाकविरोधात नारेबाजी करीत दगडफेकही केली. गेटच्या दुसर्या बाजूला काही पाकिस्तानी नागरिकही होते. त्यांच्यातील एकाच्या हातातून या आंदोलनकर्त्यांनी पाकचा ध्वज हिरावला आणि आगीच्या हवाली केला. या घटनेनंतर पाकच्या सैनिकांना पाचारण करण्यात आले होते. मुख्य गेट बंद करण्यात आल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
सूत्रांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर पाकमध्ये या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या या नागरिकांनी पाकचा झेंडा जाळून भारताच्या समर्थनार्थ नारेबाजी केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=29232

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!