Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » बलुच, पीओकेमध्ये पाक गो बॅकच्या घोषणा

बलुच, पीओकेमध्ये पाक गो बॅकच्या घोषणा

=नागरिकांनी केली स्वातंत्र्याची मागणी=
POK_Protest_1इस्लामाबाद, [१३ ऑगस्ट] – बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर जम्मू-काश्मिरात हिंसाचाराला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला त्यांच्याच नागरिकांनी पुन्हा एकदा घरचा अहेर दिला. पाकचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील सर्वच भागांमध्ये आज शनिवारी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानकडून आमच्यावर अतोनात अत्याचार सुरू असल्याचा आरोप या दोन्ही भागांतील नागरिकांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पाकव्याप्त काश्मीर भारताचेच अंग असल्याचे पाकला ठणकावून सांगितले होते. सोबतच, पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भूमिका स्पष्ट करावी, असेही सांगितले होते. त्यानंतर आज बलुच आणि पाकव्याप्त काश्मिरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन पाकविरोधात घोषणा दिल्या आणि पाकपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणीही केली. या प्रांतातून पाकी सैनिकांनी चालते व्हावे आणि आम्हाला स्वातंत्र्य द्यावे, अशी येथील नागरिकांनी मागणी आहे.
पाकिस्तानचे सैनिक आणि या देशातील राज्यकर्त्यांच्या आश्रयास असलेले अतिरेकी येथील नागरिकांवर अत्याचार करीत आहेत, असा आरोप बलुचमधील नागरिकांनी केला. आम्हाला न्याय हवा आहे, पाकपासून स्वातंत्र्य हवे आहे. त्यामुळे भारताने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
भारतीय नेत्यांनी आमची भेट घ्यावी
बलुचमधील मानवाधिकार कार्यकर्ते मर्री यांनी भारताच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पाकच्या अत्याचारापासून आम्हाला केवळ भारत सरकारच मुक्त करू शकते. पाकचे अधिकारी जर जम्मू-काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांच्या भेटी घेऊ शकतात, तर भारतीय अधिकार्‍यांनी आमची भेट का घेऊ नये, असे ट्विट त्यांनी केले आहे. सोबतच, येथील अत्याचाराचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
चीनच्या वाढत्या प्रभावाचाही विरोध
बलुच आणि पाकव्याप्त काश्मिरात चीनच्या वाढत्या प्रभावाचाही नागरिकांनी तीव्र विरोध केला. चीन व पाक केवळ आपल्या फायद्यासाठीच येथील स्रोतांचा वापर करीत आहेत. या भागांमध्ये विकासच होत नसल्याने युवकांना रोजगारापासूनही वंचित राहावे लागत आहे, असा आरोपही नागरिकांनी जाहीरपणे केला आहे.
पाकचा थयथयाट
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताचेच अंग असल्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट केला. पाकचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यावर टीका करताना, आम्हाला भारताने धडा शिकविण्याचा प्रयत्न करू नये. काश्मिरी नागरिकांवर अत्याचार होत असताना, आम्ही कदापि शांत बसणार नाही, असे म्हटले आहे.
राजनाथसिंह यांनी आम्हाला शांतता आणि बंधूभाव शिकविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, शांततेसाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतला आहे. पण, प्रत्येक वेळी भारतानेच माघार घेतली आहे. जम्मू-काश्मिरात जे सुरू आहे, ते कदापि मान्य होणार नाही, असे सांगण्याचा विसरही निसार खान यांना पडला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29211

Posted by on Aug 14 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (122 of 2483 articles)


तिरंगा यात्रेला जम्मूतून प्रारंभ पाकव्याप्त काश्मीरसाठी एक लढाई बाकी जम्मू, [१३ ऑगस्ट] - पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ...

×