Home » छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारचा मुख्यमंत्री भाजपाचाच : अमित शाह

बिहारचा मुख्यमंत्री भाजपाचाच : अमित शाह

Amit_Shah_Haryana_rallyनवी दिल्ली, [२४ ऑक्टोबर] – बिहार विधानसभा निवडणुकीचे तीन टप्प्यांतील मतदान अद्याप बाकी असताना भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज बिहारीच बिहारचा मुख्यमंत्री होईल आणि तो भाजपाचाच असेल, असे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून भाजपात, तसेच भाजपाच्या मित्रपक्षात सातत्याने चर्चा सुरू असते. रालोआतील कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे विधान करून राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी खळबळ उडवून दिली होती. या मुद्यावरून कोणताही संभ्रम होण्यापूर्वी भाजपाने मुख्यमंत्रिपदाबाबत खुलासा केला आहे.
बिहारमध्ये कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, भाजपाचा, लोकजनशक्ती पार्टीचा, राष्ट्रीय लोक समता पार्टीचा की हिंदुस्थान अवाम मोर्चाचा, हे अद्याप ठरले नसल्याचे पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कुशवाह यांनी म्हटले होते. सध्या आमचे लक्ष्य जास्तीत जास्त जागा जिंकणे आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री ठरवू, असे कुशवाह यांनी म्हटले होते. मात्र, हे सांगताना रालोआतील कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते.
मात्र, कुशवाह यांचा हा दावा भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी तातडीने खोडून काढला. बिहारचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आज शनिवारी बिहारमध्ये निवडणूक प्रचारसभेत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, असा निर्वाळा दिला. मुख्यमंत्री कोण होणार याचे कोणतेही संकेत न देता जो कोणी मुख्यमंत्री होईल, तो भाजपाचाच असेल असे त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित आमदार आणि भाजपा संसदीय मंडळ मुख्यमंत्र्याची निवड करेल, असे शाह म्हणाले.
भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. रालोआत भाजपा सर्वाधिक म्हणजे १६० जागा लढवत आहे. त्यामुळे बिहारचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच राहील, हे स्पष्ट आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25308

Posted by on Oct 25 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य (1286 of 2477 articles)


=२४ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय= लेह, [२४ ऑक्टोबर] - जम्मू-काश्मीर विधानसभेत जोरदार मुसंडी मारल्यानंतर भाजपाने आता या राज्याच्या लेह ...

×