Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » बेटी बचावसाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पुढाकार

बेटी बचावसाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पुढाकार

Amruta Fadanavis, devendra fadanavisपुणे, [१५ मार्च] – कोमल आहे, नाजुक आहे, आहे जरा बावरी, तिला जगुद्या, जन्म घेऊ द्या, खुशाल आपल्या घरी… या गाण्याचे रेकार्डिंग करून दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला. याबाबत प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जनजागृतीपर गिताचे रविवारी पुण्यातील एका स्टुडिओत रेकार्डिंग करण्यात आले.
यावेळी गीतकार प्राजक्ता पटवर्धन, संगीतकार श्रीरंग उर्‍हेकर, सगींत संयोजक अनेय गाडगीळ, दुर्गा बागवे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाल्या, स्त्रीभ्रूण हत्या हा सामाजिक प्रश्‍न आहे. याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. समाजाची विचारसरणी बदलण्याची गरज आहे. मुली या मुलांइतक्याच सक्षम असतात हा विचार समाजात रूजल्यास स्त्रीभ्रूण हत्या थांबतील. मी गाणी म्हणते. पण, आता बर्‍याच दिवसांनंतर मी गात आहे. मध्ये बरीच गॅप झाली. गाणे रेकार्डिंगचा हा माझा पहिलाच अनुभव आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान हे गाणे सोशल नेटवर्किंग साईट आणि एफएम रेडिओवरून गुढी पाडव्यापासून प्रसारित होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21481

Posted by on Mar 16 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1911 of 2476 articles)


=लोकसभा निवडणूक, दुपारी १२ नंतरच घेतले फोन कॉल्स, पुस्तकातील दावा= नवी दिल्ली, [१५ मार्च] - १६ मे २०१४ रोजी सकाळी ...

×