Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे

ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे

=सुमित्रा महाजन यांचे आवाहन=
Sumitra mahajan says in BRICS summitजयपूर, [२० ऑगस्ट] – समान विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे. या देशांच्या संघटित होण्यावरच विकासाचे लक्ष्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज शनिवारी येथे केले.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स समूहाच्या महिला संसदीय फोरमच्या परिषदेचे उद्‌घाटन सुमित्रा महाजन यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताचा विकास अजेंडा देखील ब्रिक्सच्या समान विकासावरच आधारित आहे. गरिबांचे सक्षमीकरण करून दारिद्र्यावर मात करण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे. याच अनुषंगाने समाजाच्या कल्याणासाठी आम्ही पावलेही उचलली आहेत, असे महाजन यांनी सांगितले.
ब्रिक्स देशांची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या ४३ टक्के आहे आणि जागतिक जीडीपीत ब्रिक्सचा वाटा ३७ टक्के आहे. त्यामुळे जागतिक विकासाचे भवितव्यही ब्रिक्सच्या विकासावरच अवलंबून आहे. ब्रिक्स राष्ट्रांनी आपल्या विकास कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. ब्रिक्स समूहात सहकार्याची यंत्रणा आणखी मजबूत करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी यावेळी भर दिला.
पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची जी प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती ब्रिक्स समूहाने स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातूनच भरली जाऊ शकते. तसेच, या बँकेच्या माध्यमातून इतर विकसनशील देशांनाही मदत उपलब्ध केली जाऊ शकते, असे मतही महाजन यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29221

Posted by on Aug 21 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (115 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] - रशिया हा भारताचा विश्‍वसनीय मित्र आहे. प्रत्येक संकटात रशियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. रशियाचे ...

×