Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » भारताकडे संपूर्ण जग जोडण्याची कला : पंतप्रधान

भारताकडे संपूर्ण जग जोडण्याची कला : पंतप्रधान

  • विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला थाटात प्रारंभ
  • १५५ देशांतील ३५ हजार कलावंत डेरेदाखल
  • जगाला भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन

narendra modi, srisri ravishankarji vishwa sanskritik mahostavनवी दिल्ली, [११ मार्च] – भारताजवळ महान सांस्कृतिक वारसा असून, याचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. ‘मी’ पासून ‘आम्ही’ च्या दिशेने चालणे म्हणजेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आहे. आम्ही उपनिषदांपासून उपग्रहापर्यंचा प्रवास केला आहे. या महान संस्कृतीच्या मानवीय मूल्यांनी संपूर्ण जग जोडणे हेच आमचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे येथील यमुना किनारी शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय विश्‍व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सुमारे १५५ हून अधिक देशांच्या प्रतिनिधिंनी विश्‍व संमेलनात हजेरी लावली आहे.
आपल्या ओजस्वी आणि जोशपूर्ण भाषणात पंतप्रधानांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा अर्थ नव्याने उलगडून दाखविला. ते पुढे म्हणाले, आमची संस्कृती आम्हाला स्वत:साठी नव्हे, तर दुसर्‍यासाठी जगणे शिकविते. आजचा उत्सव म्हणजे कलेचा कुंभमेळाच आहे. संगीत मनाला प्रसन्न करते, डोलायला लावते. या देशाच्या प्रत्येक प्रहराचे संगीत वेगळे आहे. येथील कला पूर्णपणे विकसित होती. आज शरीराला डोलायला लावणारे संगीत बाजारात उपलब्ध आहे. मात्र, मनाला डोलायला लावणारे संगीत भारताजवळच आहे. या देशाजवळ जगाला देण्यासाठी खूप काही आहे. या भव्य उत्सवाबद्दल मी श्री श्री रविशंकर यांचे अभिनंदन करतो. पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीचा विश्‍वसंचार अशा पद्धतीने शब्दबद्ध केला की, ज्यामुळे उपस्थित लक्षावधी लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
जीवन हाच उत्सव बनवा : श्री श्री
तत्पूर्वी, उत्सवाला उपस्थित संपूर्ण जगातून आलेल्या नागरिक व प्रतिनिधिंना संबोधित करताना श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘कुणी जर चांगले काम करीत असेल, तर त्यात विघ्ने येणारच. पण ती ओलांडून पुढे गेल्यावर जे फळ मिळते ते अतिशय मधुर असते. कोणीतरी म्हणाले की, हा गुरुजींचा खाजगी पक्ष आहे. मी म्हणतो अवश्य, संपूर्ण विश्‍वच माझे कुटुंब आहे. जीवनाला उत्सवात परिवर्तित करणे हीच खरी कला आहे.’’

Short URL: https://vrittabharati.in/?p=27250

Posted by on Mar 12 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (686 of 2477 articles)


मुंबई, [११ मार्च] - गोवंश हत्याबंदी करणे ही राज्यसरकारांची संविधानिक जबाबदारी असून, गोवंश हत्याबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे ठाम मत मुख्यमंत्री ...

×