Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » भारत-कझाकिस्तानमध्ये पाच करारांवर स्वाक्षर्‍या

भारत-कझाकिस्तानमध्ये पाच करारांवर स्वाक्षर्‍या

Prime Minister, Shri Narendra Modi visiting the Nazarbayev University, in Astana, Kazakhstan on July 07, 2015. The Prime Minister of the Republic of Kazakhstan, Mr. Karim Massimovअस्तना, [८ जुलै] – भारत व कझाकिस्तान यांच्या दरम्यान पाच महत्त्वपूर्ण करारांवर आज बुधवारी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. संरक्षण सहकार्य आणि युरेनियमचा पुरवठा यावरील करारांचाही यात समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नुरसुल्तान नझारबायेव यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात यावे, यावरही दोन देशात एकमत झाले. दोन देशातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावरही भर देण्यात असून शांतता, दळणवळण आणि दहशतवाद या मुद्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. दहशतवाद हे जगापुढील मोठे आव्हान आहे. याचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे आणि आर्थिक विकासाकरिता शांतता नांदणे गरजेचे असल्याचेही दोन्ही देशांनी काढलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे.
कझाकिस्तान भारताचा आर्थिक भागीदार आहे. पण दोन राष्ट्रांनी या संबंधांना नवी दिशा देण्याची गरज असून याकरिता आपल्या सामर्थ्याचा भरपूर उपयोग करण्याची गरज असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23340

Posted by on Jul 9 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1582 of 2483 articles)


मुंबई, [८ जुलै] - पहिल्या पावसानेच मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून या पावसाचे दुष्परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई ...

×