Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » भारत-किर्गिस्तानमध्ये चार करार

भारत-किर्गिस्तानमध्ये चार करार

=संरक्षण सहकार्य, संयुक्त लष्करी कवायतींचा समावेश=
Prime Minister Narendra Modi with President of Kyrgyzstan Almazbek Atambayevबिशकेक, [१२ जुलै] – भारत आणि किर्गिस्तानमध्ये आज रविवारी चार महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यात उभय देशांमधील संरक्षण सहकार्य वाढविणे आणि प्रत्येक वर्षी संयुक्त लष्करी कवायती करण्याच्या कराराचा समावेश आहे. वाढत्या जागतिक दहशतवादावर दोन्ही देशांनी यावेळी गंभीर चिंता व्यक्त केली.
सध्या मध्य आशियातील सहा देशांच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री येथे दाखल झाले. दहशतवादाला आता कुठल्याही सीमा उरल्या नसल्याने दहशतवादाचा विस्तार रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधानांनी किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अल्माझबेक अतम्बेव यांच्याशी चर्चा करताना सांगितले. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा संयुक्तपणे लढा करण्याच्या करारावर लवकरच स्वाक्षरी करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेला चारपैकी एक करार संरक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य वाढविण्याचा असून, दोन सामंजस्य करारांनुसार दोन्ही देशांमधील निवडणूक आयोगात सहकार्य वाढविण्याचा आणि आर्थिक सहकार्य वाढविण्याचा समावेश आहे.
या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी वाढत्या जागतिक दहशतवादावर गंभीर चिंता व्यक्त केली. दहशतवादाला आळा घालण्यासाठी किर्गिस्तानने ठोस पावले उचलली आहेत. यातून त्या देशाची धर्मनिरपेक्षताच प्रतिबिंबित होते. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अतिशय मजबूत आहेत. आता आपण द्विपक्षीय संबंधाची नवी उंची गाठायला हवी, यावर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भर दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23414

Posted by on Jul 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1568 of 2483 articles)


=विरोधकांनी मुद्यांवर चर्चा करावी : मुख्यमंत्र्यांचे आवाहन= मुंबई, [१२ जुलै] - कोणत्याही प्रकारच्या चर्चेला किंवा चौकशीला आम्ही तयार आहोत. मात्र, ...

×