भारत-चीन दरम्यान २४ करारांवर स्वाक्षर्या
Saturday, May 16th, 2015=बीजिंगमध्ये ‘‘गार्ड ऑफ ऑनर’’=
बीजिंग, [१५ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौर्यावर आहेत. आज शुक्रवारी त्यांचा दौर्याचा दुसरा दिवस असून आज ते चीनची राजधानी बीजिंगमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली कुआंन्ग यांच्यासोबत चर्चा केली असून या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान तब्बल २४ करारांवर सहृया करण्यात आल्या. याशिवाय भारतात बुलेट ट्रेन सुरु करण्याच्या तांत्रिक क्षमतेचा अभ्यास करण्यावरही करार झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज शुक्रवारी सकाळी ग्रेट हॉल पीपुलमध्ये ‘‘गार्ड ऑफ ऑनर’’ देण्यात आला. यावेळी चीनचे पंतप्रधान ली. कुआंन्ग उपस्थित होते. या हॉलला चीनची संसद म्हटले जाते. त्यानंतर दोन्ही देशातील प्रतिनिधी मंडळांची चर्चा सुरु झाली. या बैठकीमध्ये सीमारेषेच्या वादापासून भारतातील चिनी गुंतवणुकीपर्यंतच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
आज नरेंद्र मोदी बीजिंगमधील प्रतिष्ठित सिंगुआ विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच योगा आणि ताईची चीनी मार्शल आर्टचं संयुक्त प्रात्याक्षिकही पाहणार आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी काही ठिकाणांना भेटी देणार असून संध्याकाळी ते शांघायकडे रवाना होतील.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22563

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!