Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » भारत फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार

भारत फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार

Prime Minister Narendra Modi at the Round Table Meeting with the French CEOs on Infrastructure in Parisपॅरिस / नवी दिल्ली, [११ एप्रिल] – भारत फ्रान्सकडून उड्डाण क्षमता असलेली ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी घोषित केले आहे. इलिसी पॅलेस येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी ही घोषणा केली.
नरेंद्र मोदी सध्या फ्रेंच दौर्‍यावर आहेत. यावेळी फे्रचचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईल होलांडे यांच्याशी झालेल्या चर्चेत राफेल खरेदीचा निर्णय घेण्यात आला. तसेच इतर करारही करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये राफेल लढाऊ विमानांचा करार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना ही विमाने भारताला लवकर उपलब्ध करून देण्याचा आग्रह केला आहे.
मागील तीन वर्षांपासून फ्रान्सकडून १२६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठीचा दोन अब्ज डॉलरचा करार प्रलंबित होता. भारताला लढाऊ विमानांची मोठी गरज असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
दरम्यान, भारत – फेंरच दरम्यानच्या संबधांना एका नव्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि फेंरच राष्ट्राध्यक्ष होलांडे यांनी महाराष्ट्रातील जैतापूर प्रकल्पाबाबतही या दोन्ही देशांदरम्यान करार झाला.
‘मेक इन इंडिया’ला एअरबसचा पाठिंबा :नरेंद्र मोदींच्या दौर्‍याचे फलित
फ्रान्सच्या तीन दिवसीय दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी एअरबस या विमान कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी एअरबसने नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवात रालोआ सरकारने सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला पाठिंबा देतानाच भारतात उत्पादन सुरू करण्याची तयारी दर्शविली.
विमानांची निर्मिती करणार्‍या या प्रकल्पाला भेट देऊन मोदी यांनी पाहणी केली. यावेळी विमान उत्पादनाबाबत प्रकल्प अधिकार्‍यांनी मोदी यांना सविस्तर माहिती दिली. एअरबस प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम ऍण्डर्स यांनी मोदी यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रकल्पात स्वागत आहे. विमान निर्मितीच्या क्षेत्रात भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे. आमच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात भारत हाच केंद्रबिंदू असून, आमच्या विमान उत्पादनातही भारताचा सहभाग वाढविण्याचा आमचा मानस आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही आपले उत्पादन भारतातही करण्यास तयार आहोत. केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगाला त्याचा फायदा व्हावा, असे आम्हाला वाटते, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21956

Posted by on Apr 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1820 of 2483 articles)


[gallery ids="21951,21952,21953"] संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी राजनयिक अधिकारी, ...

×