Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » भारत-श्रीलंका यांच्यात चार करार

भारत-श्रीलंका यांच्यात चार करार

=पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत, २१ तोफांची सलामी=
Narendra Modi with srilanka president maithripala sirisenaकोलंबो, [१३ मार्च] – सध्या तीन देशांच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज शुक्रवारी श्रीलंकेत आगमन झाले. यावेळी २१ तोफांच्या सलामीने मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. श्रीलंका दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही देशांमध्ये चार महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी काही योजनाही जाहीर केल्या.
श्रीलंकेला भेट देणारे नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षात पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. सेशेल्स आणि मॉरिशसचा दौरा केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोदी कोलंबो येथे दाखल झाले. श्रीलंकेचे पंतप्रधान मैत्रिपाला सीरिसेना यांची भेट घेऊन त्यांनी द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा केली.
माझ्यासाठी श्रीलंकेचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. १९८७ नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानाने श्रीलंका दौरा केला आहे. आमच्यातील चर्चा फलदायी राहिली. दोन्ही देशांच्या भविष्यातील संबंधांबाबत या चर्चेतून सकारात्मक आशावाद दिसून आला आहे, असे मोदी यांनी सीरिसेना यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
दरम्यान, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत चार द्विपक्षीय करार झाले. यात व्हिसा, जकात, युवाशक्तीचा विकास आणि श्रीलंकेत रवींद्रनाथ टागोर यांचे स्मारक उभारण्यासंबंधीच्या कराराचा समावेश आहे. जकातीसंबंधीच्या करारामुळे दोन्ही देशांच्या जकात अधिकार्‍यांमधील सहकार्य वाढणार असून, व्यापारही सुलभ होणार आहे. सार्क समुहाचा आर्थिक विकास साधण्यासाठी भारत आणि श्रीलंका वचनबद्ध आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी मोदी यांनी श्रीलंकेतील रेल्वे क्षेत्राकरिता ३१८ दशलक्ष डॉलर्सचे नवे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. याशिवाय, श्रीलंकेचे चलन स्थिर ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका यांच्यात १.५ अब्ज डॉलर्सचा करार करण्याचा निर्णय झाला. श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल सीरिसेना यांचे अभिनंदन करताना, श्रीलंकेच्या विकासासाठी भारताकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21426

Posted by on Mar 14 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1929 of 2483 articles)


नागपूर, [१३ मार्च] - ‘कोणत्याही प्रकारचे परिवर्तन, मग ते सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा राजकीय असो, एका दिवसात होत नसते. ...

×