Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-श्रीलंकेत नागरी अणुकरार

भारत-श्रीलंकेत नागरी अणुकरार

=संरक्षण संबंध वाढविण्यावरही सहमती=
Prime Minister Narendra Modi and the President of Sri Lanka, Maithripala Sirisena giving media statementनवी दिल्ली, [१६ फेब्रुवारी] – भारत आणि श्रीलंका यांच्यात आज सोमवारी महत्त्वाच्या नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आली. सोबतच, संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्याचे संबंध आणखी विस्तारित करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. उभय देशांमधील संबंधाला नव्या उंचीवर नेणारीच ही घडामोड आहे.
श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांचे रविवारी चार दिवसांच्या भारत भेटीवर आगमन झाले. आज सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशांसाठी अतिशय संवेदनशील असलेल्या मासेमारांच्या मुद्यावर मतैक्यासह तोडगा काढण्यासोबतच मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतर नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आली. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
‘‘नागरी अणु सहकार्यावरील द्विपक्षीय करार हा आमच्या परस्पर विश्‍वासाचे आणखी एक द्योतक आहे. भारतासोबत श्रीलंकेने अशाप्रकारचा करार प्रथमच केला आहे. कृषी आणि आरोग्यासोबतच अन्य क्षेत्रात सहकार्याचे नवे मार्ग या करारामुळे खुले झाले आहेत,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी सिरिसेना यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिरिसेना यांनी आपल्या पहिल्याच विदेश भेटीसाठी भारताची निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी महिंदा राजपक्षे यांची दहा वर्षांपासून चालत आलेली सत्ता संपुष्टात आणली होती.
भारत आणि श्रीलंकेतील नागरी अणुकरारामुळे दोन्ही देश एकमेकांना माहिती व तंत्रज्ञानाची आदानप्रदान करणे, स्रोतांची देवाणघेवाण, अणुऊर्जेच्या शांततापूर्ण उपयोगासाठी जवानांना प्रशिक्षण देणे आणि क्षमता वाढविणे यासारख्या क्षेत्रात सहकार्य करणे शक्य होणार आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये आणखी तीन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून, यात कृषी क्षेत्रातील सहकार्याच्या कराराचा समावेश आहे. सोबतच, नालंदा विद्यापीठात श्रीलंकेला सहभागी होण्याचा मार्ग मोकळा करणार्‍या अन्य एका कराराचाही समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20610

Posted by on Feb 17 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2067 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१५ फेब्रुवारी] - आपल्या देशात विजेची टंचाई आहे. शिवाय विजेची निर्यात फार खर्चिक आहे. अशा स्थितीत देशातील प्रत्येक ...

×