Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » भूकंपाच्या दोन धक्क्यांनी जपान पुन्हा हादरले

भूकंपाच्या दोन धक्क्यांनी जपान पुन्हा हादरले

  • ३५ ठार, १००० जखमी, ९० हजार बेघर
  • ७.३ इतकी तीव्रता
  • अनेक जण ढिगार्‍याखाली

japan-earthquake-apr-16माशिकी, [१६ एप्रिल] – जपानच्या दक्षिण-पश्‍चिम भागाला आज शनिवारी भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसले. यात ३५ जणांचा मृत्यू झाला असून, १००० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक घरांची पडझड झाल्याने शेकडो लोक घरांच्या ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. हजारो लोकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला आहे. सुमारे ९० हजार लोक या भूकंपामुळे बेघर झाले आहेत.
पहिल्या धक्क्याची रिश्टर स्केलवर तीव्रता ७.३ इतकी, तर दुसर्‍या धक्क्याची तीव्रता ६.५ इतकी होती. पहिला धक्का शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सव्वा वाजताच्या सुमारास बसल्यानंतर काही वेळातच दुसरा धक्का बसला. यावेळी गाढ झोपेत असलेले लोक भीतीने जागे झाले आणि घराबाहेर सैरावैरा पळत सुटले. अनेक घरांची पडझड झाली असून, ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. ढिगार्‍याखाली नेमके किती लोक दबले आहे, याबाबतची निश्‍चित माहिती नसल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासकीय अधिकार्‍याने वर्तविली आहे.
सध्या आमच्याकडे जखमींचा आकडा १००० च्या घरात आहे. पण, ढिगार्‍यांखालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरू आहे. पोलिस आणि लष्करी जवानांसोबत अन्य स्वयंसेवी संस्था यात सहकार्य करीत आहेत. समुद्रसपाटीपासून दहा किलोमीटर आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तथापि, अद्याप त्सुमानीचा धोका उद्‌भवला नाही. असे असले तरी, प्रशासनाने नागरिकांना समुद्र किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27842

Posted by on Apr 17 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (489 of 2483 articles)


लातूर, [१६ एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच मंडळी लातूर शहराच्या पाणीटंचाईबाबत लक्ष घालत असून, राज्य सरकार या बाबत ...

×