Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » मकरसंक्रांतीसाठी पंतप्रधान पासवानांच्या घरी

मकरसंक्रांतीसाठी पंतप्रधान पासवानांच्या घरी

modi-at-paswan-residence-2नवी दिल्ली, [१४ जानेवारी] – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मकरसंक्रांती उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकार्‍यांनी हजेरी लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामविलास पासवान यांच्या निवासस्थानी गेले आणि मकरसंक्रातीनिमित्त आयोजित छुदा दही भोजचा आस्वाद घेतला. यावेळी पंतप्रधानांनी पासवान कुटुंबीय आणि त्याठिकाणी जमलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. रामविलास पासवान स्वत: पंतप्रधान मोदींना आग्रह करताना दिसत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, मध्यम व लघु उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनीदेखील पासवान यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ व अन्न मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19719

Posted by on Jan 15 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2240 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख अविनाश चंदर यांना बडतर्फ करण्यात वादाचा कोणताही विषय ...

×