Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » मराठी जगभर पोहोचविण्यास राज्य सरकार प्रयत्नशील

मराठी जगभर पोहोचविण्यास राज्य सरकार प्रयत्नशील

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • भाषासंवर्धनासाठी मंगेश पाडगावकर व डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

marathi din devendra fadanvisमुंबई, [२७ फेब्रुवारी] – संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. त्याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमीत्त विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मराठी गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना स्व. शाहीर साबळे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांना कविवर्य स्व. मंगेश पाडगावकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, कार्यक्रमाचे आयोजक आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, मनीषा चौधरी, उपमहापौर अलका केळकर, देवदत्त साबळे, अंजली पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी पुढाकार घेतला जाईल. राज्य सरकार युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेचे सदस्यत्व प्राप्त करून मराठीला संगणकाद्वारे जगभर पोहोचविणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
आज २१ व्या शतकाने जी मूल्ये तयार करून दिली, त्यामुळे संचारक्रांती झाली आहे. या संचार क्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध दालने खुली केली आहेत. या दालनांचा वापर करून जोपर्यंत मराठी तरुणांच्या मनामध्ये शिरकाव करत नाही तोपर्यंत मराठीच्या विस्ताराची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपण ज्या ज्ञानाधारित समाजाचा विचार करतो या समाज रचनेत चपखल बसणारी मराठी करायची असेल तर मराठी ही ज्ञानभाषा करावी लागेल. त्यासाठी संचारक्रांतीच्या युगात मराठीचा संचार मराठी मनात करावा लागेल.
भाषा ही केवळ अभिव्यक्त होण्याचे साधन नसून ती संस्कार आणि संस्कृतीला जिवंत ठेवणारी वाहिनी आहे. मराठीला साहित्याची, संस्कृतीची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोलाचे कार्य केले आणि त्यांचे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी राज्य सरकार त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विनोद तावडे
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी भविष्यात काय करावे यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, मराठी भाषासंवर्धनासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींना मंगेश पाडगावकर आणि डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26915

Posted by on Feb 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (805 of 2476 articles)


मुंबई, [२७ फेब्रुवारी] - सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची धुंदी चढली असल्याची टीका करताना आगामी काळात पाच राज्यात होणार्‍या विधानसभघ ...

×