Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » मराठी माणसाचा अभिमान वाढवणारे संमेलन

मराठी माणसाचा अभिमान वाढवणारे संमेलन

  • नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
  • ८९ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे सूप
  • प्रथमच निरोप गीतांचे सादरीकरण

sahitya_sammelan-gadkari-satkarग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी), [१८ जानेवारी] – बालमनावर संस्कार करण्याची, त्यांच्या जडणघडणीची ताकद साहित्यात आणि साहित्यिकांत आहे. साहित्याच्या माध्यमातून उज्ज्वल राष्ट्र घडू शकते, यात वाद नाही. भारताच्या विचारधारेची परंपरा मोठी आहे. या विचारधारेत जगावर राज्य करण्याची शक्ती आहे. हा विचारांचा वारसा साहित्याच्या माध्यमातून पुढे नेला जाईल, त्यातून संस्कारित माणसाची निर्मिती होईल आणि म्हणून साहित्यिकांची जबाबदारी मोठी आहे. अशावेळी अभूतपूर्व संख्येत होणारे हे साहित्य संमेलन निश्‍चितपणे मराठी माणसाचा अभिमान वाढविणारे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
चार दिवसांपासून मोठ्या थाटात सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सोमवारी सायंकाळी सूप वाजले. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ कवी तथा गीतकार जावेद अख्तर यांच्यासह स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, भाग्यश्री पाटील, महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, उल्हास पवार, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, दुर्गा जसराज, महापौर शकुंतला धराडे, आयुक्त जाधव, विनय कोरे, नीलम गोर्‍हे, आ. मेधा कुळकर्णी, आ. गौतम चाबुकस्वार, मकरंद जावडेकर प्रभृती उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, महाबळेश्‍वरच्या बिलार आणि मालगुंड हे पुस्तकांचे गाव करणार असून, तिथे पुस्तक वाचून साहित्यिकांसोबतच गावकरी गप्पाही मारू शकतील, अशी योजना करण्यात येत आहे. स्त्री-पुरष समानतेसाठी खर्‍या अर्थाने पाठ्यपुस्तकांचे ऑडीट केले जात आहे, जेणेकरून एक सकारात्मक संदेश जाईल. दसर्‍याच्या आधीच संमेलनासाठी धनादेश पाठविण्याचे वचन दिले होते, ते महाराष्ट्र सरकारने पाळले. पुस्तक विकण्यासाठी अल्पदरात दुकाने उपलब्ध करून दिली जाईल, असा अध्यादेशही काढण्यात आला आहे. प्रकाशकांनी या अध्यादेशाचा आधार घेत मनपा आणि नगर परिषदेकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या संमेलनाची बरीच चर्चा झाली. अनेक वादही झाले. सोशल मीडियावरही हे संमेलन गाजले. मात्र, मराठी भाषकांची वारी असलेल्या मराठीच्या या उत्सवाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. वाद अधिक चिघळू नये, अशी भूमिका आम्ही घेतली. शासन मराठी भाषा आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाहीही तावडे यांनी यावेळी दिली.
जावेद अख्तर
साहित्य, कला आणि परंपरा जीवनाच्या ओढ्यात कुठेतरी मागे सुटून गेली आहे, असे वाटते. साहित्यिकाचे काम माणूस जाणून घेणे असते, तसेच ते भावनाविषयीची सौंदर्यानुभूती देत असते. मराठीतले संचित अन्य भारतीय भाषांतही अनुवादित होण्याची निकड आहे, असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक माधवी वैद्य यांनी केले. पी. डी. पाटील, विनय कोरे आदींनी यावेळी मनोगत मांडले. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे यांनी निरोपगीत सादर केले. मराठी भाषेसाठी कार्य करणार्‍या पाच संस्थांना यावेळी प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला. संचालन सुधीर गाडगीळ व शर्वरी जमेनीस यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26575

Posted by on Jan 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (894 of 2476 articles)


=राजनाथसिंहांनी घेतला सुरक्षेचा आढावा= नवी दिल्ली, [१८ जानेवारी] - पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी ...

×