Home » कायदा-न्याय, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले : कर्नल पुरोहित

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले : कर्नल पुरोहित

मुंबई, २२ ऑगस्ट –
मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, असा दावा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांनी केला आहे. मला लष्करी सेवेत पुन्हा रुजू व्हायचे आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितना सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. पुरोहितांनी देश सोडू नये आणि कुठल्याही साक्षीदारास थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखवू नये, असे कोर्टाने म्हटले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल ९ वर्षांनी पुरोहित तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
मंगळवारी विशेष न्यायालयात सुनावणीसाठी पुरोहित यांना हजर करण्यात आले. न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवण्यात आले आहे असे वाटते का, असा प्रश्‍न पुरोहितांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, यात वाटण्याचा प्रश्‍नच नाही. हेच सत्य आहे. मला गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. जामीन मंजूर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मी या निर्णयावर समाधानी आहे. आता मी माझ्या दोन्ही कुटुंबात परतणार आहे. यातील पहिले कुटुंब म्हणजे माझी पत्नी, तर दुसरे कुटुंब म्हणजे लष्कर असे त्यांनी सांगितले. विशेष न्यायालयाने पुरोहितांना त्यांच्या पत्नीस फोन करण्याची परवानगी दिली.
मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहित आठ वर्षे आठ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. सुप्रीम कोर्टाने सोमवारी मिळावा, ही आरोपीची विनंती स्वीकारार्ह असल्याचे दिसते. या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील निर्णयासाठी हा निकाल पथदर्शी असल्याचे गृहीत धरण्यात येऊ नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34840

Posted by on Aug 24 2017. Filed under कायदा-न्याय, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (44 of 2477 articles)


=देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय =शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत निर्णय =दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी =४० लाख शेतकर्‍यांचा सातबारा ...

×