Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण » माहीमच्या दर्ग्यात तिरंगा फडकतो तेव्हा

माहीमच्या दर्ग्यात तिरंगा फडकतो तेव्हा

=भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणा=

The National flag hosting on the occasion of 603 rd Urs Mahim Dargah celebration.The Chief Minister of Maharashtra state Devendra Fadnavis also present their on late evening.  Express Photos By Dilip Kagda, 17/03/16,Mumbai.

मुंबई, [१८ मार्च
सारे जहॉं से अच्छा
हिंदोसता हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसितॉं हमारा|
वरीलप्रमाणे राष्ट्रभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत आणि ‘भारत माता की जय’ च्या प्रचंड जयघोषात माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्ग्यात तिरंगा फडकविण्यात आला आणि महाराष्ट्रातीलच नव्हे; तर देशाच्या इतिहासाच्या पुस्तकातही आणखी एका सोनेरी पान लिहिले गेले. या सुवर्ण क्षणांचे प्रत्यक्ष साक्षीदार राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहून भारावून गेले.
‘मानेला चाकू लावला, तरी भारत माता की जय कदापि म्हणणार नाही’ असे वक्तव्य करणार्‍या एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती शिवरायांच्या मातीतील मुस्लिम बांधवांनी सणसणीत चपराकच लगावली असून, राज्यातील मुसलमानांच्या या राष्ट्रवादी भूमिकेमुळे देशद्रोही व फुटीरवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.
माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्गा चॅरिटेबल ट्रस्टने माहीमच्या दर्ग्यात ६०३व्या उरुसच्या निमित्ताने शुक्रवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणा करण्यात आला. प्रारंभी बिगुलाच्या निनादात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व नंतर भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. उपस्थित मुस्लिम भाविकांनीही भारत माता की जयच्या घोषणेत आपला सूर मिसळला. कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष सोहेल खंडवानी, रिझवान मर्चंट आदी उपस्थित होते. ओवेसी आणि वारिस पठाण यांच्यासारख्या फुटीर मानसिकतेच्या लोकांना राष्ट्रभक्त मुस्लिमांच्या या कृतीमुळे सणसणीत उत्तर मिळाले आहे.
तिरंगा फडकविण्याचा अभिमान : मुख्यमंत्री
मुंबईने पुन्हा एकदा देशप्रमाचे दर्शन घडवले आहे. माहीमच्या दर्ग्यामध्ये शुक्रवारी याच पार्श्‍वभूमीवर तिरंगा फडकवण्यात आला आहे. या घटनेचा आपल्याला अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील दर्ग्यात जाऊन आशीर्वाद घेतले.
दर्ग्यात तिरंगा फडकवण्याचा आपल्याला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी नोंदविली आहे. तुम्ही सच्चे मुसलमान आहात आणि तिरंगा फडकवून आपले कर्तव्य तुम्ही पार पाडले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दर्ग्याच्या फेसबुक पेजचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27451

Posted by on Mar 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण (616 of 2476 articles)


=एकच आशा उरात माझ्या, एकच आहे ध्यास= मुंबई, [१८ मार्च] - एकच आशा उरात माझ्या, एकच आहे ध्यास लाखांचा पोशिंदा ...

×