Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » ‘मिस कोलंबिया’ पॉलिना व्हेगा झाली विश्‍वसुंदरी

‘मिस कोलंबिया’ पॉलिना व्हेगा झाली विश्‍वसुंदरी

Miss Universe Paulina Vegaमियामी, [२७ जानेवारी] – विश्‍वसुंदरी स्पर्धेत या वर्षी ‘मिस कोलंबिया’ पॉलिना व्हेगा हिने बाजी मारली आहे. ‘मिस कोलंबिया’ याच टोपणनावाने ओळखली जाणारी पॉलिना २२ वर्षांची असून उद्योग व्यवस्थापन विषयाची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेत अमेरिकेची निया सांचेझ उपविजेती ठरली आहे.
‘आजच्या महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळत आहे, ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. एक महिला केवळ सुंदर दिसण्यासाठी धडपडत नाही तर ती अंतर्बाह्य सुंदर असते. हुशार, मेहनती आणि आपल्या सहवासातील सर्वांची काळजी घेण्यास उत्सुक असलेल्या महिलांचे मी प्रतिनिधित्व करते,’ असे पॉलिनाने म्हटले आहे. या स्पर्धेत एकूण ८० देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20083

Posted by on Jan 28 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (2181 of 2483 articles)


=बान की मून यांचे मत= संयुक्त राष्ट्रसंघ, [२७ जानेवारी] - भारत दौर्‍यातील आपल्या आठवणींना उजाळा देत, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान ...

×