Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » मॅडम तुसादमध्ये मोदी झाले स्थानापन्न

मॅडम तुसादमध्ये मोदी झाले स्थानापन्न

Narendra modi wax statue, Madame Tussauds museums, Londonलंडन, [२८ एप्रिल] – आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एक उपलब्धी जोडली गेली आहे. आज गुरुवारी येथील मॅडम तुसाद संग्रहालयात अन्य महत्त्वाच्या नेत्यांसह मोदी यांच्या पुतळ्यानेही स्थान ग्रहण केले आहे.
मोदी यांचा मेणाचा पुतळा नुकताच दिल्ली येथून येथील बाकर स्ट्रिटवर असलेल्या या संग्रहालयात पोहोचला. गुरुवारी या पुतळ्याला जागतिक नेत्यांच्या रांगेत स्थानापन्न करण्यात आले.
याच रांगेत अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, एंजेला मर्केल आणि फ्रान्सवा ओलोंद यांचेही मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.
मेणाचा पुतळा बनवण्याच्या कामात मोदी यांची कलाकारांशी जवळीक निर्माण झाली होती. पुतळा पूर्ण झाल्यावर ते खूप आनंदी होते. एवढेच नाही तर कलाकारांचे कौतुक करताना मॅडम तुसादची चमू आपल्या कामात खूपच पारंगत असल्याचे मतही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
मागच्या आठवड्यात भारतात मोदी हा पुतळा पाहू शकले, याचा आम्हाला आनंद झाल्याचे सांगून संग्रहालयाचे महाव्यवस्थापक एडवर्ड फुलर पुढे म्हणाले की, येथे येणार्‍या पर्यटकांना आता हा लोकांना आवडणारा प्रभावशाली नेता जवळून पाहता येणार आहे.
मेणाच्या पुतळ्यातील मोदी यांनी आवडता क्रिम रंगाचा अर्ध्या बाहीचा कुर्ता व जाकीट घातले असून नमस्काराच्या मुद्रेत ते हात जोडून उभे आहेत. याशिवाय मोदी यांचे आणखी तीन पुतळे बनवण्यात आले असून त्यातील एक सिंगापूर, दुसरा हॉंगकॉंग व तिसरा बँकॉक येथील संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. या प्रत्येक पुतळ्याला बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला असून त्यावर दीड लाख पौंड खर्च झाल्याचेही सांगण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28059

Posted by on Apr 29 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (419 of 2483 articles)


=शहीद भगतसिंग यांचा अतिरेकी असा उल्लेख= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - दिल्ली विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकात शहीद भगतसिंग यांचा उल्लेख क्रांतिकारी अतिरेकी ...

×