Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » मोदींचा दौरा म्हणजे नव्या युगाचा प्रारंभ

मोदींचा दौरा म्हणजे नव्या युगाचा प्रारंभ

=बांगलादेशातील प्रसार माध्यमांची स्तुतिसुमने=
bangladeshi newspapers on modiढाका, [७ जून] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा म्हणजे नव्या युगाचा प्रारंभ असल्याचे सांगून बांगलादेशातील प्रसार माध्यमांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली असून, दोन्ही देशांदरम्यान झालेला सीमा करार हा द्विपक्षीय संबंधांमधील मैलाचा दगड असल्याचे नमूद केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसांच्या दौर्‍यातील पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला सीमा करार झाला आणि कोलकाता-ढाका-आगरतळा व ढाका-शिलॉंग-गुवाहाटी बससेवेचा शुभारंभही. बांगलादेशातील वृत्तपत्रांनी मोदींचे दिवसभरातील कार्यक्रम आणि त्यांनी केलेल्या भाषणांचे विस्तृत वार्तांकन केले आहे. ‘‘दोन अतिशय घनिष्ठ मित्र असलेल्या शेजारी देशांमध्ये झालेला सीमा करार हा निश्‍चितच ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे सहकार्याचे नवे द्वार खुले झाले आहे’’, या शब्दात ‘प्रथम आलो’ या सर्वाधिक खपाच्या बांगलादेशी वृत्तपत्राने मोदींच्या दौर्‍याचे वर्णन केले आहे. सीमा कराराबाबत गेल्या चार दशकांच्या कालखंडात आलेल्या अडचणी आणि समस्यांचा वृत्तपत्राने ऊहापोह केला आहे. याशिवाय भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या बंडखोरांना आश्रय न देण्याचे शेख हसीना सरकारचे धोरणदेखील खूप महत्त्वाचे आहे आणि सीमा करार होण्यात या मुद्याचेही मोठे योगदान असल्याचे वृत्तात नमूद केले आहे.
द डेली स्टार या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावरील मथळाच ‘डॉन ऑफ अ न्यू इरा’, असा देऊन पंतप्रधान मोदींचे वर्णन केले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी आतापर्यंतचे संदिग्ध राजकारण, लघुदृष्टी असलेली डिप्लोमसी आणि सुस्त नोकरशाहीच्या युगाचा अस्त करून एक नवा अध्याय सुरू केला आहे, असेही वृत्तपत्राने म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी बर्‍याच काळापासून प्रलंबित असलेल्या तिस्ता पाणी करार प्रकरणातही लक्ष घातले आणि याबाबत ते प्रामाणिक आहे, असे नमूद करतानाच वृत्तपत्राने या करारात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अडथळा असल्याचे सांगून त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22730

Posted by on Jun 8 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1665 of 2483 articles)


=नेस्लेने माफी मागावी= नवी दिल्ली, [७ जून] - नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपनीची मॅगी देशातून हद्दपार झाल्यानंतर प्रख्यात योग गुरू बाबा ...

×