Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदींनी घातला स्वत:चे नाव कोरलेला सूट

मोदींनी घातला स्वत:चे नाव कोरलेला सूट

The day PM Modi wore his name on his suitनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीचे पोशाख परिधान करतात, ते अफलातून असेच असतात. त्यांच्या वेशभूषेवर तसेही संपूर्ण जग फिदा आहेत. स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही मोदी यांच्या वेशभूषेचे चाहते आहेत. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ओबामांसोबतच्या भेटीत चक्क स्वत:चे नाव कोरलेला सूट घातला होता. या सूटला ओबामा यांनीही दाद दिली.
रविवारी हैदराबाद हाऊसमध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी मोदी यांनी निळ्या रंगाचा नवाकोरा सूट परिधान केला होता. पिवळ्या रंगाच्या उभ्या रेषा असलेला हा सूट दुरून इतर सूटसारखाच दिसत होता, पण, मीडियांच्या कॅमेर्‍यांनी मात्र त्यावर ‘झूम’ केले आणि त्यानंतर त्या सूटवर जे दिसले ते सार्‍यांनाच चकित करणारे होते. कारण, त्या सूटवरील पिवळ्या रेषा साध्यासुध्या नव्हत्या, तर त्यावर चक्क ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ हे नाव शिवण्यात आले होते. संपूर्ण सूटवरच विशेष पद्धतीने ही शिलाई करण्यात आली होती. या सूटची किंमत सहा लाख रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.
रविवारी सकाळपासून अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यांच्या फॅशनचीच चर्चा होती. मात्र सायंकाळनंतर नरेंद्र मोदींचा आगळावेगळा सूट सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर झळकला. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स ऍपवर या सूटचाच जलवा होता. पोशाखांच्या स्टाईलबाबत मोदी अतिशय चोखंदळ असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20103

Posted by on Jan 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2171 of 2477 articles)


=२१ दिवसात तक्रारींचे निराकरण करणार= मुंबई, [२७ जानेवारी] - ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ ...

×