Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » मोदींसाठी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष बनले सारथी

मोदींसाठी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष बनले सारथी

Mexico President drives PM modi to restaurantमॅक्सिको, [९जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौर्‍यावर असून दौर्‍याचा अंतिम टप्पा असलेल्या मॅक्सिकोमध्ये पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नीटो यांची भेट घेतली. स्वित्झर्लंड पाठोपाठ मेक्सिकोनेही अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) राष्ट्र समूहाच्या सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे.
नरेंद्र मोदी विमानतळावर उतरताच भारतीय वंशांच्या नागरिकांनी ‘भारत माता की जय आणि मोदी – मोदी’ या घोषणांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी नीटो यांनी भारताच्या एनएसजी गटासाठी पाठिंबा दर्शविल्याने मॅक्सिकोचे आपण आभारी आहोत असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
यानंतर नरेंद्र मोदी आणि नीटो यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मोदींनी मोदींनी मेक्सिकोसोबत औषध उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीवर भर दिला. तसेच अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणुकीची आशा व्यक्त केली. या चर्चेनंतर एनरिक पेना नीटो यांनी स्वतः कार चालवत नरेंद्र मोदींना जेवणासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथे नरेंद्र मोदींसोबत नीटो यांनी शाकाहारी जेवण घेतले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28558

Posted by on Jun 10 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (259 of 2483 articles)


पुणे, [८ जून] - रखरखत्या उन्हामुळे जिवाची लाही लाही झाल्यानंतर संपूर्ण देश ज्या नैॠ त्य मोसमी पावसाची वाट पाहात होता ...

×