Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » मोदी सरकारचे पहिले वर्ष समाधानकारक

मोदी सरकारचे पहिले वर्ष समाधानकारक

=अमेरिकेतील तज्ज्ञांचे मत=
Narendra_Modi Rick_Rossowवॉशिंग्टन, [६ मे] – गेल्या वर्षी १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत रालोआ सरकार भारतात सत्तेवर आले. या सरकारच्या पहिल्या एक वर्षाची कारकीर्द अतिशय समाधानकारक राहिली आहे. सरकारचे पहिले वर्ष उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने अतिशय चांगले असल्याचे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
केवळ भारतातीलच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे पहिले वर्ष अगदी परिपूर्ण असल्याचा दावा आम्ही करणार नाही. पण, हे एक उत्कृष्ट असेच वर्ष आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग सरकारने त्यांच्या पहिल्या वर्षात जी कामगिरी केली होती, त्यापेक्षा कितीतरी सरस अशी कामगिरी नरेंद्र मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षात करून दाखविली आहे, असे अमेरिकेतील प्रख्यात विचारवंत रिक रॉसो यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने संभाव्य परिणामांचा विचार करून आर्थिक निर्णय घेतले आहेत, असे नक्कीच म्हणता येईल. नव्या सरकारची कामगिरी संमिश्रपेक्षाही थोडी जास्त असून, अमेरिकेतील व्यापारी समुदायांना ज्या चिंता भेडसावत असतात, त्या धोरणातील काही मुद्यांचे निराकारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी या एक वर्षाच्या काळात काही मोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत, असे नमूद करताना रॉसो म्हणाले की, भारतातील बाजारपेठ खुली करण्यासाठी भारतीय गुंतवणुकदारांसह विदेशी गुंतवणूकदारांवर परिणाम करणारे काही नियम या सरकारने शिथिल केले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22435

Posted by on May 7 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1733 of 2483 articles)


‘हिट ऍण्ड रन’प्रकरणी दोषी हायकोर्टाने दिला दोन दिवसांचा जामीन १३ वर्षांनंतर लागला खटल्याचा निकाल मुंबई, [६ एप्रिल] - १३ ...

×