मोदी सरकारला ५९ टक्के लोकांची पसंती
Tuesday, May 12th, 2015- सुषमा स्वराज सर्वोत्कृष्ट मंत्री
- नितीन गडकरीही उतरले पसंतीला
- इंडिया टीव्ही, सी-व्होटरचा सर्व्हे
नवी दिल्ल्ली, [१२ मे] – याच आठवड्यात केंद्रातील सत्तेचे एक वर्ष पूर्ण करीत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजावर देशातील बहुतांश जनता खुश आहे. सुमारे ५९ टक्के लोकांनी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. विशेषत: परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे कार्य जनतेच्या पसंतीला उतरले आहे.
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने इंडिया टीव्ही आणि सी-व्होटर या संस्थेने सरकारच्या कामकाजाविषयी जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करताना देशव्यापी सर्वेक्षण केले. यात ५९ टक्के लोकांनी ‘अतिशय चांगले’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर, ४१ टक्के लोकांनी ‘साधारण’ असे म्हटले आहे.
या सर्वेक्षणात सुषमा स्वराज यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट मंत्री असल्याचा कौल मिळाला आहे. त्यांच्या कामाला ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर, ३१ टक्के लोकांनी सरासरी आणि केवळ १३ टक्के लोकांनी त्यांचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा. त्यांचे काम चांगले आहे, असे जाहीरपणे सांगणारा वर्ग ५० टक्क्यांच्या घरात आहे. ३६ टक्के लोकांनी सरासरी आणि १४ टक्के लोकांनी त्यांचे काम खराब असल्याचे म्हटले आहे.
त्याचप्रमाणे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काम चांगले असल्याचे ४८ टक्के लोकांनी सांगितले आहे. तर, २८ टक्के लोकांनी त्यांचे कामकाज सरासरी आणि २३ टक्के लोकांनी खराब असल्याचे म्हटले आहे. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कामाला ४४ टक्के लोकांकडून पसंती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामावरही ४० टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात ७८ टक्के लोकांनी मोदी सरकारने भूमी अधिग्रहण विधेयक परत घ्यावे, असे मत व्यक्त केले आहे.
स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा
नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतलेल्या योजनांबाबत विचारणा केली असता, ४६ टक्के लोकांनी स्वच्छ भारत अभियानाला पसंती दिली आहे. १९ टक्के नागरिकांनी जन-धन योजना, १८ टक्के लोकांनी मेक इन इंडिया आणि ११ टक्के लोकांनी आदर्श ग्राम योजनेला पाठिंबा दर्शविला आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22524

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!