Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते!

मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते!

नवी दिल्ली, [२० जानेवारी] – बराक ओबामा यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज शुक्रवारी संपला असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत सोशल मीडियावर मोदी यांचे फॉलोअर्स फार जास्त आहेत. बराक ओबामांचे ट्विटर फॉलोअर्स ८ कोटी ७ लाख १७ हजार आहेत, तर ट्रम्प यांचे २.४ कोटी फॉलोअर्स आहेत. परंतु आजपासून ओबामांचा समावेश जागतिक नेत्यांमध्ये होणार नसल्याने २ कोटी ६४ लाख ७८ हजार फॉलोअर्ससह पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सध्या क्रमांक एकचे जागतिक नेते ठरले आहेत.
यातही विशेष म्हणजे, बराक ओबामांच्या फेसबूक पेजला लाईक्स देणार्‍यांची संख्या ५.२८ कोटी आहे. तर, मोदी यांच्या फेसबुक पेजला लाईक्स करणार्‍यांची संख्या ३.९२ कोटी आहे. याशिवाय मोदी यांचे गुगल प्लसवर ३० लाख, लिंक्ड इनवर १९ लाख, इन्स्टाग्रामवर ५० लाख आणि यूट्यूबवर ५.९१ लाख फॉलोअर्स आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29390

Posted by on Jan 21 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (74 of 2477 articles)


बेलो होरिझोन्टो , [१४ नोव्हेंबर] -  विश्‍व करंडक पात्रता फेरींच्या फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझील संघाने अर्जेटिनाचा ३-० गोलने पराभव केला. ...

×