Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरणार!

यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरणार!

=भारतीय वेधशाळेचा इशारा=
India_heat_wave_largeनवी दिल्ली, [२३ एप्रिल] – यावर्षीचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त राहणार, अशी आनंदाची बातमी देणार्‍या भारतीय वेधशाळेने आज शनिवारी धक्कादायक बातमीही दिली आहे. यंदाचे अर्थात २०१६ हे वर्ष आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण ठरणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
एप्रिल महिन्याचा एक आठवडा अजूनही शिल्लक आहे. पण, तापमानाने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. एप्रिलचा शेवटचा आठवडा भीषण तापणार असून, त्यानंतर संपूर्ण मे महिनाही शरीराची लाही लाही करणारा ठरणार आहे. वेधशाळेच्या मते, आगामी काही महिने तटस्थ राहणार असलेल्या अल् निनोचाच हा प्रभाव आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी वेधशाळेने अल् निनो जेव्हा प्रबळ असतो, तेव्हा त्याच्या प्रभावातील १९७३, १९९५, १९९८, २००३ आणि २०१० या वर्षातील, तसेच अल् निनो जेव्हा कमजोर होतो, तेव्हा त्याच्या प्रभावातील १९७२, १९९४, १९९७, २००२ आणि २००९ या वर्षातील उन्हाळ्यात असलेल्या तापमानाची आकडेवारी सादर केली.
वेधशाळेच्या मते, देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान विक्रमी उच्चांकावर जाईल. प्रचंड उष्णतेची लाट निर्माण होईल आणि त्याचा परिणाम जनजीवनावरही दिसून येईल. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या नॅशनल ओसेनिक ऍण्ड ऍटमॉसफेरीक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेनेही भारतात २०१६ हे वर्ष अतिशय उष्ण राहणार असल्याचे भाकीत नोंदविले होते. विशेषत: या वर्षातील मार्च महिना केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी उष्ण राहणार असल्याचेही या संस्थेने म्हटले होते.
‘‘२०१५ या वर्षाचे आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. वातावरणातील बदल यासाठी कारणीभूत ठरले असल्याचेही अभ्यासात दिसून आले आहे. पण, २०१५ पेक्षाही २०१६ हे वर्ष उष्ण राहणार आहे. पाराही कधी नव्हे अशा पातळीवर जाणार आहे.’’
लक्ष्मणसिंह राठोड, महासंचालक

Short URL: https://vrittabharati.in/?p=27972

Posted by on Apr 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (446 of 2477 articles)


=शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांचा इशारा= नवी दिल्ली, [२३ एप्रिल] - हाजी अली दर्ग्यातील मजारवर जाण्याचा प्रयत्न केल्यास ...

×