Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » युएईमध्ये महापुराचे थैमान

युएईमध्ये महापुराचे थैमान

=अनेक विमाने रद्द, दुबईत २५७ रस्ते अपघात=
UAE-floods-riyadh3दुबई, [१० मार्च] – सगळीकडे वाळवंट, प्रचंड उकाडा आणि कधीकाळीच पडणार्‍या पावसाने बुधवारी मात्र कहर केला आणि युएईमध्ये रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले.
बुधवारी युएईमधील हवामान अचानक बदलले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळ आणि पावसामुळे परिस्थिती इतकी खराब झाली की, गुरुवारी सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.
एकट्या दुबईत सात तासांत तब्बल २५७ रस्ते अपघात झाले. या पावसामुळे ओमानमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. वाळवंट आणि प्रचंड उक़ाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात महापूर आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
युएईमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ११ वाजता हवामान बदलले. आकाशात काळे ढग दाटून आले आणि थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. काही तासांतच सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते. सायंकाळपर्यंत परिस्थिती आणखी बिघडल्याने प्रशासनाने गुरुवारी शाळांना सुटी जाहीर केली. ओमानमध्येही जोरदार पाऊस पडला आणि यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. अबुधाबी येथे स्टॉक मार्केट बंद करण्यात आले.
अबुधाबी विमानतळावरून उड्डाण करणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली. वादळामुळे अनेक विमानांचे नुकसान झाले असून, त्यांची तपासणी झाल्यानंतरच ते उड्डाण करू शकतील, असे सांगितले जात आहे. दुबईत १२६ किमी प्रतितास या वेगाने वादळासह पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांवर चार फूट पाणी जमा झाले. अल सुहेब येथे सर्वाधिक २४० क्युबिक मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27194

Posted by on Mar 10 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (713 of 2483 articles)


जीएसटीसह महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्यासाठी सहकार्य करा अभिभाषणावरील उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन नवी दिल्ली, [९ मार्च] ...

×