Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » येदीयुरप्पा कर्नाटकचे भाजपाध्यक्ष, केशवप्रसाद मौर्य उत्तरप्रदेशचे

येदीयुरप्पा कर्नाटकचे भाजपाध्यक्ष, केशवप्रसाद मौर्य उत्तरप्रदेशचे

Yedurppa-Mauryaनवी दिल्ली, [८ एप्रिल] – भाजपाने पाच राज्यातील आपल्या प्रदेशाध्यक्षांची आज घोषणा केली. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असलेल्या उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांचाही यात समावेश आहे. उत्तरप्रदेशचे अध्यक्ष म्हणून खा. केशवप्रसाद मौर्य, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री विजय सांपला, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा, तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून डॉ. के. लक्ष्मण आणि अरुणाचल प्रदेशचे अध्यक्ष म्हणून तापिर गाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण उत्तरप्रदेशात पुढील वर्षी म्हणजे २०१७ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अलाहाबादजवळच्या फूलपूरचे खासदार केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे भाजपाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून केशवप्रसाद मौर्य यांनी १४ वर्षे काम केले होते. मागासवर्गीय समाजातून आलेल्या मौर्य यांनी लहानपणी वृत्तपत्र आणि चहा विकून आपली उपजीविका केली होती. लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली.
केंद्रीय मंत्री विजय सांपला यांच्याकडे भाजपाने पंजाबची जबाबदारी सोपवली आहे. माजी खासदार तापिर गाव यांच्याकडे अरुणाचल प्रदेशची धुरा देण्यात आली. तेलंगणाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. के. लक्ष्मण यांची निवड करण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि केंद्रीय महासचिव अरुणसिंह यांनी आज या नियुक्त्यांची घोषणा केली.
भाजपाने कर्नाटकची जबाबदारी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्याकडे सोपवली आहे. २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून २०१२ मध्ये येदीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच कारणामुळे त्यांनी भाजपाचा राजीनामा देत राज्यात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कर्नाटक जनता पार्टीची स्थापना केली होती. येदीयुरप्पांच्या अनुपस्थितीत लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पाहावा लागला होता, एवढेच नव्हे तर भाजपा राज्यात तिसर्‍या स्थानावर आली होती.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपाच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर येदीयुरप्पा यांनी भाजपात प्रवेश केला होता. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून येदीयुरप्पा यांची नियुक्ती केली होती. आज अमित शाह यांनी त्यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करत कर्नाटकात येदीयुरप्पा यांच्याशिवाय भाजपाला पर्याय नसल्याचे दाखवून दिले आहे. येदीयुरप्पावर लावण्यात आलेला भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, असे भाजपाचे महासचिव अरुणसिंह यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27778

Posted by on Apr 9 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (502 of 2477 articles)


नवी दिल्ली, [९ एप्रिल] - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सरकारने ‘स्कील इंडिया’ (कौशल्य विकास) योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवले आहे. सचिन ...

×