Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » येमेनमधून ६६४ नागरिक सुखरूप परतले

येमेनमधून ६६४ नागरिक सुखरूप परतले

general-vk-singh-returned-with-passengersमुंबई/कोची, [४ एप्रिल] – येमेनमध्ये अस्थिरता माजली असताना भारत सरकारने आपल्या नागरिकांसाना मायदेशी परत येण्याचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत ६६४ भारतीय नागरिक शनिवारी पहाटेच्या सुमारास भारतात परत आले.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह स्वत: जिबुतीमध्ये वास्तव्यास असून, भारतीयांच्या सुटकेबाबत प्रयत्नशील आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणजे ६६४ भारतीय नागरिक शनिवारी पहाटे भारतात पोहोचले आहेत. यातील ३३४ नागरिक विशेष जम्बो विमानाने मुंबईत आणि उर्वरित ३३० नागरिक केरळच्या कोची येथे परतले आहेत.
अल हुदायदा या बेटावरून सुटका करण्यात आलेले भारतीय नागरिक हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर्स या दोन विमानांनी मुंबईत दाखल झाले. आयएनएस सुमित्रा या जहाजातून या नागरिकांना जिबुती येथे आणण्यात आल्यानंतर अल हुदायदा या बेटावरून भारतीय नागरिकांना घेऊन जहाज जिबुतीला पोहोचले. त्यानंतर हवाई दलाच्या दोन विमानातून या नागरिकांना रवाना करण्यात आले. येमेनमध्ये जवळपास चार हजार भारतीय नागरिक आहेत. यात सर्वात जास्त नागरिक केरळचे रहिवासी आहेत. दरम्यान, दुसर्‍या टप्प्यात आयएनएस मुंबई हे जहाज ४०० नागरिकांना घेऊन शनिवारी ऍडेन बेटावर पोहोचणार आहे. यानंतर या जहाजातील नागरिकांना जिबुतीला आणण्यात येणार आहे. जहाजातील सर्व नागरिक सोमवारी म्हणजे ६ एप्रिलला भारतात पोहोचतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21897

Posted by on Apr 6 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1829 of 2477 articles)


=प्रशांत भूषण यांचा हल्ला= नवी दिल्ली, [४ एप्रिल] - आम आदमी पार्टीच्या सर्वच महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण ...

×