Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » योग आरोग्याचे विज्ञान आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

योग आरोग्याचे विज्ञान आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Indian Prime Minister Narendra Modi, center, greets thousands of yoga enthusiasts as they gather to celebrate World Yoga Day in Chandigarh, India, Tuesday, June 21, 2016. Millions of yoga enthusiasts are bending their bodies in complex postures across India as they take part in a mass yoga program to mark the second International Yoga Day. (AP Photo/Saurabh Das)

चंदीगड, [२१ जून] – आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स येथे ३० लोकांच्या उपस्थितीत योगासने करून योगदिन साजरा केला. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘‘योग हे धार्मिक कर्मकांड नसून आरोग्याचे विज्ञान आहे. योग आस्तिकांसाठी आहे आणि नास्तिकांसाठीही आहे. जगात कुठेही झिरो बजेट विमा काढला जात नाही. मात्र योग हे असे विज्ञान आहे जे शुन्य रक्कम खर्च करून तुमचे आरोग्य सुरक्षित करते’’.
या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्‌टर आणि राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी उपस्थित होते. नरेंद्र मोदी हे सोमवारी रात्रीच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. येथे त्यांनी ३० हजार लोकांसोबत योग केला. त्यांच्या आसणा शेजारी आर्मी जवान आणि दिव्यांग मुलांचे आसण होते.
त्यानंतर योगासनचे महत्व पटवून देताना मोदी म्हणाले की, भारताच्या प्रयत्नांमुळेच संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास मान्यता दिली आहे. २१ जून हा वर्षांतील सर्वात मोठा दिवस असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. योग हा धार्मिक कर्मकांडाचा भाग नाही. तर योग ‘इहलोक’चे विज्ञान आहे. योगाच्या माध्यमातून आपण अनेक रोग दुर करू शकतो. योग केवळ आजारांपासून मुक्ती मिळवून देत नाही तर आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी मदत करते. पुढील वर्षी योग दिनी दोन पुरस्कार दिले जातील. एक असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी तर दुसरा पुरस्कार भारतामध्ये योगासाठी चांगले काम करणार्‍यांना इंडिया योग अवॉर्ड.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28699

Posted by on Jun 22 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (203 of 2477 articles)


मुंबई, [२१ जून] - आज जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस दिवस साजरा होत असून, भारतानेही मागील पाच-सहा वर्षांपासून ...

×