Home » छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » रजनीकांत राजकारणात येणार?

रजनीकांत राजकारणात येणार?

वृत्तसंस्था
चेन्नई, ६ फेब्रुवारी –
‘सुपरस्टार’ रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रजनीकांत यांनी ‘ताकद’ विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तामिळनाडूत खळबळ माजली आहे. रजनीकांत राजकारणात उतरणार, असे अनेकांना वाटते आहे.
रजनीकांत स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करतील, अशी अटकळ लावली जात आहे. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. तामिळनाडूत प्रवेश करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न असून, यासाठी रजनीकांत यांचा होकार मिळवण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरू आहेत, असे काहींचे म्हणणे आहे. रजनीकांत यांनी मात्र, आपण ’ताकद’ शब्दप्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचे स्पष्ट केले आहे. अध्यात्मात ताकद असून आपल्याला ताकद आवडते, असे वक्तव्य रजनीकांत यांनी केले होते.
तामिळनाडूत जयललिता यांच्यानंतर आता शशिकला सत्तास्थानी असून,  रजनीकांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीतून राज्याला वाचवण्याचे आवाहन केले आहे, हे विशेष.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29417

Posted by on Feb 7 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (64 of 2477 articles)


►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी - अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या ...

×