Home » छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य » राजद म्हणजे ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’

राजद म्हणजे ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’

  • नितीश, लालूंमुळेच बिहार मागासला
  • पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

modi-IN-bihar-CHAPRAछपरा, [२५ ऑक्टोबर] – मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तांत्रिकाच्या भेटीचा, तसेच मी तांत्रिकाचाही बाप आहे, या लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्याचा धागा पकडून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी लालूंच्याच बालेकिल्ल्यात जदयु आणि राजदवर घणाघाती हल्ला चढविला. लालू हे महातांत्रिक आहेत आणि त्यांचा राजद म्हणजे ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
येथे भाजपाच्या निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील युवक आणि कमजोर समाजाच्या विकासासाठी सहा सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला ‘बिजली, पानी, सडक आणि कमाई, पढाई व दवाई’ या मूलभूत सुविधा केवळ भाजपाच देऊ शकते. कारण, भाजपाने आजवर केवळ विकासाचेच राजकारण केले आहे, असे पंतप्रधानांनी ठासून सांगितले.
राज्यात भाजपा सत्तेवर असेपर्यंत बिहार विकासाच्या प्रवाहात होता. पण, भाजपाने सत्तेचा त्याग केल्यानंतर ‘मोठा भाऊ’ लालू आणि ‘लहान भाऊ’ नितीशकुमार यांनी बिहारला पुन्हा एकदा जंगलराजकडे नेले. बिहारच्या आजच्या स्थितीसाठी हे दोघेच जबाबदार आहेत. या दोघांनी या निवडणुकीला ‘बिहारी विरुद्ध बाहरी’ असा रंग दिला आहे. पण, मी परम आदरणीय लोकतांत्रिक नितीशकुमार आणि स्वत:ला तांत्रिकांचेही बाप म्हणवून घेणारे लालूप्रसाद यांना एवढेच विचारू इच्छितो की, बिहारी युवकांना रोजगाराच्या शोधात राज्याबाहेर जाण्यासाठी कुणी भाग पाडले. येथील युवकांना आपले घरदार, आई-वडील सोडून बाहेर का जावे लागले? असे मोदी म्हणाले. लालू आणि नितीशकुमार यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळात बिहारमधील दोन पिढ्या पूर्णपणे उद्‌ध्वस्त केल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25333

Posted by on Oct 26 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य (1279 of 2477 articles)


पंकजा मुंडे यांची माहिती विमा योजनेचाही प्रस्ताव मुंबई, [२४ ऑक्टोबर] - ऊसतोडणी कामगारांचे हित लक्षात घेऊन कामगारांच्या मजुरीत वाढ ...

×