Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » राम नाईक यांचे विचार संसदीय जीवनाचे ब्रीद: फडणवीस

राम नाईक यांचे विचार संसदीय जीवनाचे ब्रीद: फडणवीस

=चरैवेती! चरैवेती!चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन=

मुंबई, [२६ एप्रिल] – राम नाईक यांचे विचार हे माझ्या संसदीय जीवनाचे ब्रीद वाक्य असून त्यांच्या विचारानेच मी राजकारणात मोठा झालो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या चरैवेती! चरैवेती! या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार, प्रकाशक आनंद लिमये, विनय सहस्रबुद्धे, कार्यक्रमाचे संयोजक आमदार आशिष शेलार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती पूर्ण कशी करावी, हे राम नाईक यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. ते राजकारणात, समाजकारणात ज्या ज्या भूमिकांतून गेले, त्या त्या भूमिकेशी समरस होऊन त्यांनी कार्य केले. वेळेचे नियोजन हा त्यांचा महत्त्वपूर्ण गुण असून एक व्यक्ती आपल्या जीवनात किती काम करू शकतो, याचा प्रत्यय या पुस्तकाच्या माध्यमातून होतो. चरैवेती! चरैवेती! हे या पुस्तकाचे नाव राम नाईक यांच्या जीवन चरित्राशी साजेसे आहे. या पुस्तकाचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित करावा, अशी इच्छाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28017

Posted by on Apr 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (430 of 2476 articles)


नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने ...

×